Geeta Updesh : दानवीर कर्णाकडून शिकायला हव्यात ‘या’ ५ गोष्टी; प्रत्येक ठिकाणी मिळेल मान सन्मान!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : दानवीर कर्णाकडून शिकायला हव्यात ‘या’ ५ गोष्टी; प्रत्येक ठिकाणी मिळेल मान सन्मान!

Geeta Updesh : दानवीर कर्णाकडून शिकायला हव्यात ‘या’ ५ गोष्टी; प्रत्येक ठिकाणी मिळेल मान सन्मान!

Published Oct 16, 2024 08:00 AM IST

Geeta Updesh In Marathi: आम्ही तुम्हाला कर्णाकडून शिकून घेण्यासारख्या अशाच काही गोष्टी सांगणार आहोत,ज्यामुळे तुमचे जीवन यशस्वी होऊ शकते.

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Updesh In Marathi : श्रीमद्भगवद्गीता हा सनातन धर्मातील एक महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे, हे आपण सर्वजण लहानपणापासून हे ऐकत आलो आहोत. गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करणारा प्रत्येक माणूस चांगला व्यक्ती बनतो. भगवंताने सांगितले आहे की, कोणत्याही परिणामाची इच्छा न करता तुम्ही तुमचे कर्म करत राहा. त्याचे परिणाम तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळतील. जिथे जिथे महाभारताचा उल्लेख आहे, तिथे कौरव आणि पांडवांव्यतिरिक्त दानशूर कर्णाचाही उल्लेख होतो. आज आम्ही तुम्हाला कर्णाकडून शिकून घेण्यासारख्या अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे जीवन यशस्वी होऊ शकते. यामुळे तुम्हाला समाजात मान-प्रतिष्ठाही मिळू शकते.

कर्णाकडून शिकाव्यात ‘या’ ५ गोष्टी!

> परोपकारी कर्णाविषयी सांगताना श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे की, पराभव निश्चित असला तरी विजयासाठी झटत राहणे अत्यंत आवश्यक आहे. कर्णाला आधीच माहित होते की युद्ध हे धर्म आणि अधर्म यांच्यात आहे आणि कौरव अधर्मी आहेत, त्यामुळे पांडवांचा विजय निश्चित आहे. हे माहीत असूनही त्याने त्याचा मित्र दुर्योधनाला साथ दिली. यावरून हे सिद्ध होते की, जर तुम्ही कोणाशी एकनिष्ठ असाल आणि कोणी तुमच्यावर आंधळा विश्वास ठेवत असेल, तर त्याचा विश्वास कधीही तोडू नका.

> माणसाने नेहमी दानशूर कर्णाकडून शिकले पाहिजे की, प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला खचू देऊ नये. कारण भगवान श्रीकृष्णाने जेव्हा त्याला तो कुंतीपुत्र असल्याचे सांगितले, तेव्हाही त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आपल्या निश्चयावर ठाम राहून संघर्ष केला आणि कौरवांच्या बाजूने लढला.

Geeta Updesh : कधीही करू नका गर्व; अन्यथा यशात येईल अडथळा! गीता उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात...

> जीवनात प्रत्येक व्यक्तीने दानवीर कर्ण यांच्याकडून शिकले पाहिजे की, व्यक्तीने नेहमी आपल्या मित्राशी प्रामाणिक राहावे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी कर्ण सदैव कौरवांच्या पाठीशी उभा राहिला. हीच मैत्रीची खरी ओळख आहे. म्हणून जर कोणाशी मैत्री करत असाल, तर कर्णासारखी मैत्री ठेवा.

> माणसाने दानवीर कर्णाकडून शिकले पाहिजे की, केवळ शिक्षणच नाही तर शिक्षण देणाऱ्या शिक्षकाचाही आदर केला पाहिजे. कारण आई-वडिलांनंतर योग्य मार्ग दाखवणारा एकच शिक्षक असतो, जो तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला मदत करतो.

> आपण उदार कर्णाच्या दृढनिश्चयातून धडा घेतला पाहिजे. कर्ण असा व्यक्ती होता, जो आपल्या वचनांना नेहमी जगाला होता. समोर कितीही कठीण प्रसंग आला तरी, आपण एकदा वचन दिले की, परत कधीही मागे फिरू नये. मग यामुळे तुमचे नुकसान होवो किंवा तुमचा जीव जावी, मात्र तुम्ही मागे हटत कामा नये.

Whats_app_banner