Geeta Updesh: गीतेत सांगितलेत जीवनाचे ३ महत्त्वपूर्ण धडे! दुर्लक्ष कराल तर भविष्यात होऊ शकते मोठे नुकसान-geeta updesh in marathi 3 important lessons of life are told in the gita everyone should learn this ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: गीतेत सांगितलेत जीवनाचे ३ महत्त्वपूर्ण धडे! दुर्लक्ष कराल तर भविष्यात होऊ शकते मोठे नुकसान

Geeta Updesh: गीतेत सांगितलेत जीवनाचे ३ महत्त्वपूर्ण धडे! दुर्लक्ष कराल तर भविष्यात होऊ शकते मोठे नुकसान

Aug 22, 2024 05:52 AM IST

Marathi Geeta Updesh:आज आपण भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या जीवनातील अशा ३ धड्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्रत्येकाने शिकून घेणे आवश्यक आहे. अन्यथा,भविष्यात तुमचे नुकसान होऊ शकते.

Geeta Updesh In Marathi: गीतेत सांगितलेत जीवनाचे ३ महत्त्वपूर्ण धडे!
Geeta Updesh In Marathi: गीतेत सांगितलेत जीवनाचे ३ महत्त्वपूर्ण धडे!

Geeta Updesh In Marathi: सनातन धर्मात श्रीमद्भगवद्गीता अतिशय महत्त्वाची मानली जाते. या ग्रंथामध्ये धर्म, कर्म आणि ज्ञान यांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. शाळकरी मुलांनाही या पुस्तकाचा अभ्यास करायला लावला जातो. महाभारताचे युद्ध हे धर्म आणि अधर्म यांच्यात होते, ज्यात दोन्ही पक्ष एकाच कुटुंबातील होते. या वेळी धनुर्धारी अर्जुन आपल्याच लोकांविरुद्ध शस्त्र उचलण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करत होता. त्यावर मात करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला कुरुक्षेत्राच्या रणांगणात विश्वरूपाचे दर्शन देऊन गीतेचे ज्ञान दिले. भगवान कृष्णाने अर्जुनसमोर मानवी जीवनाचे संपूर्ण रहस्य मांडले, ज्यानंतर अर्जुनची कोंडी संपली. यानंतर पांडवांनी युद्ध जिंकले. गीतेच्या शिकवणीमध्ये नमूद केलेल्या सर्व गोष्टींचे स्वतःचे महत्त्व आहे, प्रत्येक व्यक्ती जो आपल्या जीवनात त्या अंमलात आणतो, तो एक आदर्श आणि थोर व्यक्ती बनतो. 

आज आपण भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या जीवनातील अशा ३ धड्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्रत्येकाने शिकून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, भविष्यात तुमचे नुकसान होऊ शकते.

काय आहेत ‘हे’ जीवनातील ३ धडे?

> गीतेच्या उपदेशात भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की, माणसाने कधीही दुसऱ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये. कारण ही अशी गोष्ट आहे की, जर विश्वास तुटला तर, माणूस आतून खचून जातो. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका आणि कुणाकडून अपेक्षा ठेवू नका. त्याऐवजी स्वावलंबी व्हा. यामुळे तुम्ही कधीही दु:खी होणार नाही आणि तुमचे जीवन उत्तम प्रकारे जगत राहाल.

Geeta Updesh: चहुबाजूनीं दाटून येईल अंधार, सगळंच वाटू लागेल कठीण; गीतेतील ‘या’ गोष्टी दाखवतील मार्ग!

> गीता उपदेशात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, व्यक्तीने कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक राहिले पाहिजे. नकारात्मकता माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. अनेक वेळा लोक नकारात्मकतेमुळे अनेक गोष्टींचा त्याग करतात, म्हणून स्वतःला कधीही नकारात्मक होऊ देऊ नका. अशा स्थितीत देवसुद्धा तुमच्यावर दुःखी होतो. तसेच, तो तुमच्यावर रागावतो आणि तुमचे घर सोडतो. त्याच वेळी, सकारात्मक आणि आनंदी लोकांवर देवाचे आशीर्वाद नेहमीच राहतात.

> भगवान श्रीकृष्णाच्या मते, जर तुमचा काळ चांगला जात असेल तर अशा वेळी स्वार्थी किंवा मतलबी बनू नका. कारण, काळाचे चक्र खूप विचित्र आहे. आजच दिवस तुमचा असेल, तर उद्या दुसऱ्या कोणाचा तरी असेल. म्हणूनच स्वार्थीपणा तुमचे आयुष्य उद्धवस्त करू शकतो. सर्वांशी नेहमी चांगले वागत राहा. स्वार्थी स्वभाव हा माणसाच्या नाशाचा मार्ग आहे. या मार्गाचा अवलंब करू नका आणि एक चांगला व सर्वोत्तम व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल.