Geeta Updesh: श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या शिकवणुकीचे वर्णन केले आहे. ही शिकवण श्रीकृष्णाने महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे. गीतेमधील ही शिकवण माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेचे उपदेश जीवनात अंगीकारून माणूस प्रगतीच्या मार्गावर पुढे जातो. गीता हा एकमेव ग्रंथ आहे जो, माणसाला प्रत्येक कठीण काळात आयुष्य जगण्याचा नवा मार्ग दाखवतो. शिवाय आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचा आत्मविश्वासही देतो. गीतेमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर उपयोगी पडतील.
गीता आयुष्यातील धर्म, कृती आणि प्रेमाचे धडे देते. श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे. आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. गीतेच्या अनमोल शिकवणुकीमधील काही महत्वाच्या गोष्टी आपण आज जाणून घेऊया.
-भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीने चांगल्यासोबत चांगले असावे पण वाईटासोबत वाईट नसावे. हिऱ्यापासून हिरा कोरता येतो पण चिखलातून चिखल साफ करता येत नाही असे श्रीकृष्ण सांगतात. म्हणून, आपण नेहमी आपले आचार आणि विचार सुसंगत ठेवावे. त्यामुळे आयुष्य सुलभ बनते.
-श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं आहे की, प्रत्येक व्यक्तीमध्ये पाच गुण असायला हवेत. यामध्ये शांतता, सौम्यता, मौन, आत्मसंयम आणि पवित्रता यांचा समावेश होतो. हे सर्व गुण असणारे व्यक्तीच चांगल्या मार्गावर चालू शकतात.
-श्रीकृष्ण गीतेत सांगतात की, प्रत्येक व्यक्तीचे भाग्य हे त्याच्या भूतकाळातील कर्माचे फळ असते. आज आपण केलेली कृती तुमचा उद्याचा दिवस ठरवेल. म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म केले पाहिजेत.
-भगवान श्रीकृष्णाच्या मते, अहंकार माणसाला अशा गोष्टी करायला भाग पाडतो, ज्यामुळे शेवटी त्याचा विनाश होतो. म्हणून माणसाने कधीही अहंकार बाळगू नये. आनंदी जीवनासाठी, शक्य तितक्या लवकर तुमचा अहंकार सोडणे महत्वाचे आहे.