Geeta Updesh In Marathi: हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि लोकप्रिय ग्रंथांपैकी एक म्हणजे श्रीमद भागवत गीता होय. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीवर जीवनाबाबत काही उपदेश केले होते. त्यालाच गीतेची शिकवण असे संबोधले जाते. श्रीमद भागवत गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनच्या प्रश्नांची उत्तरे तर दिलीच पण यशस्वी जीवन जगण्याचा मार्गही दाखवला. म्हणूनच गीतेची शिकवण आजही लोकांना मार्गदर्शन करत आहे. जर तुम्हाला यशस्वी जीवन जगायचे असेल तर गीतेत दिलेल्या शिकवणींचे पालन करणे आवश्यक आहे. पौराणिक मान्यतेनुसार, महाभारतात युद्धाच्या रणांगणावर अर्जुनाची पाऊले जेव्हा डगमगू लागली होती, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनला काही महत्वाचे सल्ले दिले होते. हेच सल्ले आजच्या एकविसाव्या शतकातदेखील लागू होतात.
गीतेत सांगितलेले भगवान श्रीकृष्णाचे उपदेश आजही मनुष्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात. अशा वेळी कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि आयुष्यात यश मिळविण्यासाठी गीतेच्या काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार या उपदेशाचे जो व्यक्ती आपल्या रोजच्या जगण्यात अवलंबन करतो, तो कधीही अपयशी होत नाही. त्याला आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत विजय प्राप्त होतो. शिवाय चुकीच्या मार्गावर जाण्यापासून बचाव होतो. त्यातीलच काही उपदेश आज आपण जाणून घेणार आहोत.
* भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश केला आहे की, ज्ञानी माणूस नातेसंबंध जपणे आणि टिकवणे तेव्हा बंद करतो जेव्हा त्याचा स्वाभिमान दुखावला जातो.
* श्रीकृष्णाने सांगितले आहे, माणसाचा वाईट काळच त्याला स्वतःच्या माणसांना ओळखायला शिकवतो. जेव्हा एखादी व्यक्ती संकटात एकटी पडते तेव्हाच त्याला कळते की त्याच्यासोबत कोण खंबीरपणे उभा आहे आणि त्याला संकटात सोडून कुणी पळ काढला आहे.
*कोणत्याही परिस्थितीत नेहमी प्रयत्न करत राहावे. अपयशाने खचून प्रयत्न करणे सोडू नये. शेवटी प्रयत्न केल्यानेच यश तुमच्या पदरात पडते.
*गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात की, माणसाला जे त्याच्या नशिबात लिहिले आहे ते नक्कीच मिळते. आणि जे त्याच्या नशिबात लिहिलेले नाही ते इच्छा असून आणि प्रयत्न करूनही मिळत नाही. त्यामुळे स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवावा.
* माणसाने आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक लहान-लहान गोष्टीसाठी देवाचे आभार मानले पाहिजेत. अनेकदा सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींची किंमत माणसाला समजत नाही. पण एखादी गोष्ट निघून गेल्यावर त्याची किंमत कळते. मग ते नातेसंबंध असो वा सांसारिक सुख.
*श्रीकृष्णाच्या मते एखाद्या व्यक्तीला स्वतः पेक्षा चांगले कुणीही ओळखू शकत नाही. त्यामुळेच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. ज्या व्यक्तीला स्वतःची कमतरता आणि स्वतःचे प्रभावी गुण समजतात, तेव्हाच तो व्यक्ती एका उत्तम व्यक्तिमत्वाची रचना करु शकतो. आणि त्यातूनच त्याला प्रत्येक कार्यात यश प्राप्त होऊ शकते.
*भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाच्या मते, श्रीमंत माणूस तो असतो ज्याचे विचार चांगले असतात, ज्याच्याकडे गोड नातेसंबंध असतात आणि ज्याचे वर्तन प्रामाणिक असते. तो व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो.
संबंधित बातम्या