Geeta Jayanti 2024 : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला गीता जयंती साजरी केली जाते. यावेळी आज ११ डिसेंबर २०२४ रोजी गीता जयंती साजरी केली जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गीता जयंतीला मोक्षदा एकादशीचे व्रत देखील पाळले जाते, जे भगवान विष्णूला समर्पित आहे. गीता जयंती का साजरी केली जाते आणि गीते संबंधीत अनेक प्रश्न पडतात, चला तर जाणून घ्या भगवत गीतासंबंधीत काही प्रश्न आणि उत्तर.
१. गीता जयंती कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते?
उत्तर. गीता जयंती भगवत गीतेच्या जन्मदिवसाला उद्देशून साजरी केली जाते.
२. भगवद्गीता म्हणजे काय?
उत्तर. भगवद्गीता हा एक पवित्र हिंदू धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर राजकुमार अर्जुन आणि देव कृष्ण यांच्यातील संवादाचा समावेश आहे.
३. भगवद्गीता खरी आहे का?
उत्तर. भगवद्गीता हा खरा आणि पवित्र ग्रंथ आहे. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर झालेला हा संवाद आहे.
४. भगवद्गीता कोणी लिहिली?
उत्तर. भगवद्गीता हा भारतीय महाकाव्य महाभारताचा एक भाग आहे, जो व्यास ऋषींनी लिहिलेला आहे.
५. भगवद्गीतेचे वक्ते कोण आहेत?
उत्तर. भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण आहे.
६. भगवद्गीता कोणत्या महाकाव्यात आढळते?
उत्तर. भगवद्गीता महाभारत या महाकाव्यात आढळते.
७. भगवद्गीतेचा मुख्य श्रोता कोण आहे?
उत्तर. भगवद्गीतेचा मुख्य श्रोता अर्जुन आहे.
८. भगवद्गीतेमध्ये कोणत्या युद्धाचे वर्णन आहे?
उत्तर. भगवद्गीतेमध्ये कुरुक्षेत्र युद्धाचे वर्णन आहे.
९. गीतेत किती अध्याय आणि श्लोक आहेत?
उत्तर. गीतेत १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत.
१०. श्रीकृष्णाने गीता उपदेश कोणाला दिला होता?
उत्तर. श्रीकृष्णाने गीता श्लोकाद्वारे अर्जुनाला उपदेश दिला होता.
११. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा पाठ केव्हा व का समजावून सांगितला?
उत्तर. महाभारताचे विनाशकारी युद्ध होणार होते आणि अर्जुन लढण्यास नकार देत होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी गीता श्लोकाद्वारे अर्जुनाला समजावून सांगितले.
१२. गीतेचा काळ कोणता होता?
उत्तर. गीतेचा काळ मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा येतो.
१३. भगवान श्रीकृष्णाने गीतेचे महात्म्य गीतेच्या कोणत्या श्लोकात सांगितले आहे?
उत्तर. अध्याय १८ च्या ६८ ते ७१ श्लोकात.
१४. गीतेतील १८ ह्या संख्येचे महत्व काय?
उत्तर. गीतेत एकूण अठरा अध्याय आहेत. एकूण सैन्य अठरा अक्षौहिणी होते. कौरव-पांडवांचे युद्धसुद्धा अठरा दिवस चालले. महाभारतात एकूण अठरा पर्व आहेत.
१५. जगाच्या अंताबद्दल भगवद्गीता काय सांगते?
उत्तर. हे जग वारंवार निर्माण केले जाते, राखले जाते आणि नष्ट केले जाते.
१६. भगवद्गीता कुठे लिहिली गेली?
उत्तर. भगवद्गीता भगवान कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सांगितली होती. बद्रिकाश्रम येथील वेदव्यासांच्या आश्रमात गणेशाने ते लिहिले होते.
१७. भगवद्गीता क्रोधाबद्दल काय सांगते?
उत्तर. इंद्रियांच्या वस्तूंचे चिंतन करताना मनुष्याला त्यांच्याबद्दल आसक्ती निर्माण होते आणि अशा आसक्तीतून वासना निर्माण होते आणि वासनेतून क्रोध उत्पन्न होतो. रागातून संपूर्ण भ्रम निर्माण होतो आणि भ्रमातून स्मरणशक्तीचा भ्रमनिरास होतो. जेव्हा स्मरणशक्ती भ्रष्ट होते तेव्हा बुद्धी नष्ट होते आणि जेव्हा बुद्धी नष्ट होते तेव्हा माणूस पुन्हा भौतिक तलावात पडतो.