Geeta Jayanti 2024 In Marathi : गीता जयंती बुधवार, ११ डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला ही जयंती साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. वर्षभरात २४ एकादशी असतात. अधिक महिने पडल्यास एकादशीची संख्या २६ पर्यंत वाढते. या दिवशी उपवास केल्याने व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जीवनातील दु:खांपासून मुक्ती मिळते. जाणून घ्या गीता जयंती आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची पद्धत आणि दानाचे महत्व.
गीता जयंती तिथी : ११ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजून ४३ मिनिट ते दुपारी १ वाजून ९ मिनिटापर्यंत.
अश्विनी नक्षत्र : १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४८ मिनिट ते रात्री ९ वाजून ५२ मिनिटापर्यंत.
अमृतकाळ : सकाळी ९ वाजून ३४ मिनिट ते रात्री ११ वाजून ३ मिनिटापर्यंत
गीता जयंतीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे आणि पिवळे कपडे परिधान करावेत. यानंतर मंदिराची साफसफाई करून भगवान सूर्याला जल अर्पण करावे. या प्रसंगी श्रीमद्भगवद्गीतेचे पठण फळदायी ठरते. अक्षत आणि फुलांनी भगवत गीता ग्रंथाची पूजा करा आणि पठणाला सुरुवात करा. तसेच भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी.
स्नान वगैरे केल्यानंतर मंदिराची साफसफाई करा. पंचामृतासह गंगा जलाने भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक करा आता भगवंताला पिवळे चंदन आणि पिवळी फुले अर्पण करा मंदिरात तुपाचा दिवा लावा, शक्य असल्यास उपवास ठेवा आणि उपवास करण्याचा संकल्प करा.
श्रीमद्भगवद्गीतेचे पठण करा, ॐ कृष्णाय नम: मंत्राचा जप करा, भगवान श्री हरी विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूर्ण भक्तीभावाने आरती, शेवटी क्षमा प्रार्थना करा.
गीता जयंतीच्या दिवशी लोकांनी गीता ग्रंथाचे दान करावे. याशिवाय श्रद्धेनुसार फळे, मिठाई, पैसे, उबदार कपडे दान करावेत. असे मानले जाते की हे कार्य केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)