Geeta Jayanti 2023: तुमच्या घरीही श्रीमद्भगवद्गीता आहे, मग या गोष्टींची काळजी घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Jayanti 2023: तुमच्या घरीही श्रीमद्भगवद्गीता आहे, मग या गोष्टींची काळजी घ्या

Geeta Jayanti 2023: तुमच्या घरीही श्रीमद्भगवद्गीता आहे, मग या गोष्टींची काळजी घ्या

Updated Dec 21, 2023 06:58 PM IST

Geeta Jayanti 2023: शुक्रवार २२ डिसेंबर २०२३ रोजी, मार्गशीर्ष शुक्ल एकादशी असून, या दिवशी गीता जयंती साजरी करतात. या दिवशी श्रीमद्भगवद्गीतेचे पूजन केले जाते. जर तुमच्याही घरी श्रीमद्भगवद्गीता असेल तर या गोष्टींची नक्की काळजी घ्यावी.

bhagavad gita
bhagavad gita

कौरव आणि पांडव यांचे युद्ध होणार हे जेव्हा निश्चित झाले तेव्हा, महाभारताच्या कुरुक्षेत्रात श्रीकृष्णाने मार्गशीर्ष शुक्ल एकादशी तिथीला अर्जुनाला उपदेश दिला. यामुळे मार्गशीर्ष शुक्ल एकादशी तिथी गीता जयंती म्हणून साजरी करण्यात येते.

या दिवशी गीता पाठ करणार्‍यांचे प्रत्येक कार्य यशस्वी होते, सोबतच सुख समृद्धी येते. श्रीमद्भगवद्गीतेत ७०० श्लोक आहेत. शास्त्रानुसार ज्या लोकांच्या घरी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ ठेवला आहे त्यांनी काही नियमांचे पालन करावे, अन्यथा जीवनात अडचणी येण्याची शक्यता असते.

तुमच्या घरी श्रीमद्भगवद्गीता असल्यास अशी काळजी घ्या

श्रीमद्भागवत गीता घरी ठेवताना आणि पठण करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, तरच पूर्ण फळ प्राप्त होते असे सांगितले जाते. हा एक अतिशय पवित्र ग्रंथ आहे, म्हणून तो स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवावा.

आंघोळ केल्याशिवाय, घाणेरड्या हातांनी किंवा मासिक पाळीच्या वेळी गीतेला स्पर्श करू नये. यामुळे मानसिक व आर्थिक ताणतणाव सुरू होण्याची शक्यता असते असे सांगितले जाते.

श्रीमद्भगवद्गीता जमिनीवर ठेऊन वाचू नये. यासाठी चौरंग किंवा पाट वापरावे. तसेच गीता लाल कपड्यात बांधून ठेवा.

श्रीमद्भगवद्गीता वाचन करताना बसायला आपलेच आसन वापरावे. दुसऱ्यांचे आसन घेऊ नये, यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो. पठण सुरू करण्यापूर्वी श्रीगणेश आणि श्रीकृष्णाचे स्मरण करावे.

तुम्ही दिवसभरात कधीही गीता पाठ करू शकता पण जर तुम्ही एखादा अध्याय सुरू केला असेल तर तो अर्धवट सोडू नका. संपूर्ण अध्याय वाचल्यानंतरच उठा.

हे श्लोक नेहमी स्मरणात ठेवावे

१.हतो वा प्राप्यसि स्वर्गम्, जित्वा वा भोक्ष्यसे महिम्।

तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय:॥

जीवनात संघर्ष करावा, कोणत्याही संकटाला घाबरून जाऊ नये असे वाटत असल्यास हा श्लोक म्हणावा.

२.यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन:।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।

गीतेमध्ये सांगितलेल्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, एक उत्तम पुरुष श्रेष्ठ कार्य करतो, इतर त्याच्यासारखे वागतात. असे म्हणतात की, श्रेष्ठ माणसाचे कृत्य पाहून संपूर्ण मानव समाजही त्याच्या सारख्याच गोष्टींचे पालन करु लागतात.

३.कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।।

याचा अर्थ माणसाचा फक्त त्याच्या कर्मांवरच अधिकार आहे. तुम्हाला कर्माचे फळ माहित नाही आणि कळू शकत नाही. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणाले की, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. त्याच वेळी, चुकीचे काम करु नका.

Whats_app_banner