Geeta Updesh: सुखी जीवनासाठी भगवद्गीतेतून शिकण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी! प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हव्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: सुखी जीवनासाठी भगवद्गीतेतून शिकण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी! प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हव्या

Geeta Updesh: सुखी जीवनासाठी भगवद्गीतेतून शिकण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी! प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हव्या

Published Jul 21, 2024 05:50 AM IST

Geeta Updesh In Marathi: जर, आपण भगवद्गीतेतील शिकवणीचे पालन केले, तर आपण आपल्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतो. अशाच काही चांगल्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया...

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Updesh In Marathi: भगवद्गीतेत ज्याचे उत्तर नाही, अशी समस्याच निर्माण झालेली नाही. प्रश्न आपल्या मनात असेल, तर भगवद्गीतेत प्रत्येक समस्येला उत्तर आहे. अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण या पवित्र ग्रंथातून शिकू शकतो आणि आपल्या जीवनात त्याचे अनुसरण करू शकतो. चला जाणून घेऊया...

प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा, निकालावर नाही!

निकालाने काहीही फरक पडणार असला, तरी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. चांगले परिणाम मिळवण्यासाठी आपण आपले प्रयत्न देखील सुधारले पाहिजेत. तुमच्या हातात फक्त प्रयत्न करणे इतकेच आहे. निकालाबद्दल कुणीही खात्री देऊ शकत नाही. जर, परिणाम तुमच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर तुम्हाला विनाकारण त्रास सहन करावा लागू शकतो. केवळ तुमचा प्रयत्न परिणाम ठरवत नाही. तर, परिस्थिती, लोक आणि इतर अनेक घटक परिणाम बदलू शकतात. तसेच, तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास निराश होऊ नका. त्या गोष्टीतील रस गमावू नका. प्रयत्न करणे थांबवू नका.

वासना, लोभ, क्रोध यांना आळा घाला!

वासना, लोभ, क्रोध.. हे तिन्ही आत्मपतनाचे कारण बनतात. या ३ गोष्टी बहुतेक समस्यांची मूळ कारण आहेत. समस्या एखाद्या वस्तूचे वेड लागण्यापासून सुरू होते. वासनेचे लोभात रूपांतर होते. अजून हवे आहे या आशेने जे आपल्याला पाहिजे ते मिळत नाही, तेव्हा त्याचे रागात रूपांतर होते. हीच स्थिती तुमची मनःशांती हिरावून घेते.

Palmistry : भाग्यशाली लोकांच्या हातात असते ही शनिरेषा; हे लोकं कमावतात बक्कळ पैसा, कधीच रिकामा राहत नाही खिसा

समुद्रासारखे स्थिर राहणे!

नदीचे पाणी समुद्रात वाहत राहते. मात्र, त्यामुळे समुद्राचे पाणी हलत नाही. नदीच्या पाण्याप्रमाणे विचारांचा प्रवाह आपल्या मनात झिरपत राहतो. तथापि, आपण समुद्रासारखे शांत राहण्यास शिकले पाहिजे. कशाचीही काळजी करू नये. वाईट विचार नेहमी आपल्या मेंदूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, संयम ठेवून आयुष्य पुढे न्यावे.

टिकून राहा!

काळ बदलत असताना आपली दु:खही तात्पुरती असतात. दुःख येतात आणि जातात. मात्र, जेव्हा दुःख आणि अडचणी येतात, तेव्हा तुम्हाला त्यापासून स्वतःचा बचाव नक्कीच करायचा आहे. त्यांच्यामुळे निराश होऊन जाऊ नका. फक्त बदल हा शाश्वत असतो. त्यामुळे कशाचीही काळजी करू नका.

सर्व काही चांगले आहे.. म्हणत राहा!

जे घडले ते तुमच्या भल्यासाठी आहे, जे घडते आहे ते तुमच्या भल्यासाठी आहे आणि जे होईल ते चांगल्यासाठीच आहे, असाच विचार करा. भूतकाळाचा विचार करण्याची आणि भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. आपल्या बाबतीत जे घडते, ते घडणारच होते हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे की, जे काही घडते ते चांगल्यासाठीच होते. आता वेळ तुमच्या अनुकूल नसेल, पण चांगले दिवस नक्कीच येतील. फक्त विश्वासाने पुढे जा.

Whats_app_banner