Gautama Buddha Story: एकदा भगवान बुद्ध उपदेश देत होते. तेव्हा काही लोक एका आंधळ्या व्यक्तीसोबत बुद्धांकडे आले. तो आंधळा व्यक्ती काही सामान्य माणूस नव्हता. तो व्यक्ती एक महान शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासक होता. या व्यक्तीने तर्क करण्यात ते अत्यंत निपुण कौशल्य प्राप्त केले होते. त्याने आपल्या युक्तिवादाने अनेक विद्वानांचा पराभव केला होता.
तो बुद्धांकडे आल्यावर त्यांच्याशीही वाद घालू लागला. बुद्धांना उद्देशून तो म्हणाला, 'प्रत्येकजण म्हणतो की, या विश्वात प्रकाश आहे. पण, मी म्हणतो प्रकाश नावाचं काहीही नाही. माझा विश्वास आहे की, या जगात प्रकाश नावाची कोणतीही गोष्ट नाही. आणि, जर प्रकाशासारखी गोष्ट असेल, तर मला त्याची जाणीव करून द्या म्हणजे मला स्पर्श होईल आणि जाणवेल. जर, मला काही चाखायचे असेल तर, मी त्याचा आस्वाद घेऊ शकतो. जर, एखादी सुगंध असेल, तर मी त्याचा वास घेऊ शकतो. किंवा जर आवाजासारखी काहीतरी गोष्ट आहे, म्हणून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वाजवता, तेव्हा मला ती ऐकू येते. या माझ्या चार इंद्रियांच्या माध्यमातून मला चार गोष्टी जाणवतात.’
पुढे हा व्यक्ती म्हणाला की, ‘आता लोक ज्या पाचव्या इंद्रियांबद्दल बोलतात, माझ्या मते, ही केवळ कल्पना आहे. कोणालाही दृष्टी नाही. माझ्या मते, प्रत्येकजण केवळ गोंधळलेला आहे’. या व्यक्तीचं बोलणं ऐकून भगवान बुद्धांना समजलं की, या व्यक्तीला समजावून सांगणं खूप कठीण आहे. कारण प्रकाश स्पर्शाने, चवीने, वासाने किंवा ऐकून जाणवू शकत नाही. तो डोळ्यांनीच पाहता येतो. ही व्यक्ती असं बोलून इतरांना गोंधळात टाकत आहे, आणि तो स्वतः गोंधळलेला आहे. त्या व्यक्तीला डोळे नव्हते, पण तो बुद्धांना आव्हान देत होता. बुद्धांनी त्याला सांगितले की, ‘मी काहीही सिद्ध करणार नाही. पण मला एक डॉक्टर माहीत आहे, जो तुमची दृष्टी बरी करू शकेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही याला माझा युक्तिवाद म्हणू शकता.’
बुद्धांनी त्याला एका डॉक्टरकडे पाठवले. डॉक्टरांच्या उपचाराने त्यांचे डोळे सहा महिन्यांत बरे झाले आणि त्याने पहिल्यांदा प्रकाश पाहिला. त्या व्यक्तीचा यावर विश्वास बसत नव्हता. तो आनंदाने बुद्धाकडे धावला आणि त्यांच्या पाया पडत म्हणाला की, मला डॉक्टरांकडे पाठवण्याचा तुमचा तर्क कामी आला. यावर भगवान बुद्ध म्हणाले की, ‘हा वाद किंवा तर्कवाद नाही. मी तुझ्याशी वाद घातला असता, तर मी तुझ्यासमोर फोल ठरलो असतो. कारण काही गोष्टी अशा असतात, ज्या तर्काने तपासल्या जाऊ शकत नाहीत. त्या केवळ अनुभवानेच ओळखता येतात. जसे की, आता तुमचे डोळे बरे झाले, तेव्हा तुम्हाला प्रकाशाचा अनुभव आला आणि प्रकाश म्हणजे काय हे तुम्हाला कळले.’