Gautam Buddha : अडचणी सोडवण्याचा मार्ग कोणता?, वाचा गौतम बुद्धांचा मोलाचा संदेश
Gautam Buddha Preaching : आयुष्यातील अनेक अडचणी आणि समस्यांवर भगवान गौतम बुद्ध यांनी उपाय सांगितलेले आहे. त्याचं पालन केल्यास तुम्हाला सुख-शांती प्राप्त होवू शकते.
gautam buddha inspirational story : भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर अनेक लोक त्यांची भेट घेत समस्या सांगून त्यावरील उपाय समजून घ्यायचे. आताच्या नेपाळमधील लुंबिनीत बुद्धांचं प्रवचन ऐकण्यासाठी त्याकाळी मोठ्या संख्येने लोक गर्दी करत असत. आयुष्य, करियर, वैवाहिक जीवन, प्रवास, जन्म, मृत्यू, स्वर्ग आणि नर्क याबाबत गौतम बुद्ध हे लोकांनी माहिती देत प्रेरणा देण्याचं काम करायचे. त्यामुळं लोकांनाही नवी माहिती मिळत ज्ञान मिळायचं. अशातच एक तरुण धावत गौतम बुद्धांकडे आला आणि त्याने आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांचा पाढाच गौतम बुद्धासमोर वाचून दाखवला. त्यावर गौतम बुद्धांनी त्याला दिलेलं उत्तर आजच्या तरुणांनाही प्रेरणा देत असतं.
ट्रेंडिंग न्यूज
आयुष्यातील कोणत्याच प्रश्नांचं उत्तर मी शोधू शकत नाही, सतत मानसिक तणावात असून ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नर्क, सृष्टी याबाबतच्या अनेक प्रश्नांचं काहूर डोक्यात माजल्याचं तरुणाने गौतम बुद्धांना सांगितलं. त्यावर गौतम बुद्ध शांतपणे म्हणाले, डोक्यातील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न हा व्यक्तीला ज्ञानप्राप्तीकडे नेवू शकतो. त्यामुळं संशोधनातून आणि अध्यात्मातून या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, असं म्हणत गौतम बुद्धांनी प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला संशोधनाची प्रेरणा देण्याचा मार्ग सांगितला होता. त्यानंतर अनेक लोकांनी गौतम बुद्धांची शिकवण आपल्या आयुष्यात अंगिकारली.
मी देखील तुमच्यासारखाच मनुष्य आहे. मी काही फार ज्ञानी नाही. तुमच्या आयुष्यातील अडचणी माझ्या अडचणी आहे. तुम्ही सुखी नाहीत, याचं मला दु:ख आहे. व्यक्तीला अहंकारी आणि आत्मकेंद्रित बनवणारं ज्ञान काहीच कामाचं नाही, अशा ज्ञानी व्यक्तीपेक्षा अज्ञानी व्यक्ती बरा आहे. त्यामुळं लोकांचं कल्याण करायंच असेल तर ज्ञान मिळवणं अत्यंत आवश्यक असल्याचं बुद्ध म्हणायचे. त्यामुळं गौतम बुद्धांनी अनेक वर्षांपूर्वी लोकांनी दिलेलं प्रवचन आणि ज्ञानाचा मार्ग आजच्या तरुणांनाही प्रेरणा देत असतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग