Gauri Avahan Wishes : गौराई येता घरी बाप्पालाही आनंद होई! अशा द्या ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या शुभेच्छा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Gauri Avahan Wishes : गौराई येता घरी बाप्पालाही आनंद होई! अशा द्या ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या शुभेच्छा

Gauri Avahan Wishes : गौराई येता घरी बाप्पालाही आनंद होई! अशा द्या ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या शुभेच्छा

Published Sep 09, 2024 07:30 PM IST

Gauri Avahan Shubhechha : महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाच्या काळात गणपतींच्या पाठोपाठ गौराईचं आगमन होतं. उद्या १० सप्टेंबर रोजी गौरी आवाहन असून, हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या प्रियजणांना या खास शुभेच्छा पाठवा.

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा

आपल्या हिंदु धर्मात सण-उत्सवाचे आगळे-वेगळे महत्व आहे. प्रत्येक सणाला एक परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे. मराठी १२ महिन्यातील प्रत्येक महिन्याचे महत्व आहे. प्रत्येक महिन्यात काही सण-उत्सव, परंपरा किंवा पूजा-विधी केली जाते, ज्यामुळे घरात आपल्या कुटूंबात सुख-समृद्धी लाभते, सकारात्मकता वाढते. श्रावण महिन्याच्या पाठोपाठ येणारा भाद्रपद महिनाही असाच खास असतो. कारण विशेष म्हणजे या महिन्यात गौरी गणपती आपल्या घरी येतात.

देशभरात ७ सप्टेंबर रोजी गणपतींचे मोठ्या थाटामाटात प्रतिष्ठापना झाली आहे. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाच्या काळात गणपतींच्या पाठोपाठ गौराईचं आगमन होतं. आता ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात येईल. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हंटले जाते.

यंदा गौराई १० सप्टेंबर रोजी गौरी आवाहन आहे, ११ सप्टेंबर रोजी गौरी पूजन होईल तर १२ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन करण्यात येईल. काही घरात ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौराई येतात. एक दिवसाचा पाहुणचार स्वीकारून गौराईचं तीसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येते. आकर्षक सजावट करून गौराईचे स्वागत करण्यात येते.

गौरी म्हणजे पार्वती. शिव शंकराची पत्नी माहेरपणाला येते आणि आशिर्वाद देऊन जाते अशी या सणामागील धारणा आहे. गौरी आवाहनानंतर दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. त्यादिवशी रात्रभर सार्‍या माहेरवाशिणी खेळ खेळून सण साजरा करतात आणि तीसऱ्या दिवशी पुढच्या वर्षी पुन्हा या असे सांगून क्षमा प्रार्थना करून गौरीचे विसर्जन करतात. चला तर मग गौरी आवाहनाच्या शुभेच्छा देऊन हा आनंद आणखी वाढवूया.

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा

सण वर्षाचा आला गं सजलेल्या अंगणी,

उमा पार्वती होऊन आली माहेरची पाहुणी

आली गवर (गौरी) आली आली,

सोनपावली आली

आली गवर (गौरी) आली आली,

सोनपावली आली!

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या खूप खूप शुभेच्छा

सोन्याच्या पावलाने येणारी 

श्री.महालक्ष्मी आपल्या कुटुंबातील सर्वांना 

उत्तम आरोग्य,धनधान्य,समाधान व उदंड आयुष्य देवो

गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

गौरी गणपतीच्या आगमना,

सजली अवघी धरती,

सोनपावलाच्या रुपाने

ती येवो आपल्या घरी,

होवो आपली प्रगती,

लाभो आपणास सुख समृद्धी

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

आई गौराई गणाची, 

आली माझ्या गं अंगणी

संगे शिव चंद्रमोळी, 

करु पुजेची तयारी

झिम्मा फुगडीच्या संगे, 

रात्र उत्साही जागेल

आगमनाचा सोहळा, 

माझ्या अंगणी रंगेल

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनी

गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी,

आनंद आणि भरभराट घेऊन येऊ दे

ही सदिच्छा!

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

गौराई माते नमन करते तुला

अखंड सौभाग्य लाभू दे मला

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

आली माझ्या गं अंगणी गौराई,

लाभो तुम्हास सुख समृद्धी,

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

सोन्याच्या पावली गौराई घरी आली, 

आगमनाने तिच्या संध्या चैतन्याने न्हाली! 

ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Whats_app_banner