Garud Puran: हिंदू धर्मातील १८ पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूचा महिमा सांगितला आहे. मानवाच्या जीवनातील संकटांसाठी आणि सुखी जीवन जगण्यासाठी अनेक नीतीतत्त्वे दिली आहेत. गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास ते सदैव बलवान राहतील, असे मानले जाते. गरुड पुराणात एका श्लोकाच्या माध्यमातून सांगितले आहे की, काही कामे मध्येच सोडू नये. ही कामे मध्येच सोडल्यास आगामी काळात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या औषधांची काळजी घ्यावी. अनेकदा लोक पूर्णपणे निरोगी न राहता मध्येच औषधे घेणे थांबवतात. ज्यामुळे येत्या काळात हा आजार वाढू शकतो.
गरुड पुराणात म्हटले आहे की, कोणत्याही ठिकाणी आग लागली तर ती पूर्णपणे विझवावी. एखादी छोटीशी ठिणगी शिल्लक राहिल्यास पुन्हा आग लागू शकते. ज्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
गरुड पुराणानुसार जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड वेळेत करावी. कर्जाची परतफेड वेळेत न केल्यास त्याचे व्याज वाढू शकते. अशावेळी पैशांमुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने लवकरात लवकर कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
गरुड पुराण हा संस्कृत ग्रंथ हिंदू धर्माच्या १८ पुराणांपैकी एक आहे. गरुड पुराणाची रचना अंदाजे इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाली असावी. त्यानंतर पुढे काही शकते यात भर आणि विस्तार होत राहिलेला आहे. गरुड पुराणाची प्रारंभिक रचना ही इसवी सन पूर्व ४ थी आणि इसवी सन पूर्व ११ व्या शताब्दी दरम्यान झाली असावी असा विद्वानांचा अंदाज आहे. गरुड पुराणात १५ हजारांहून अधिक श्लोक आहेत.
गरुड पुराण हे वैष्णव पुराण असल्याचे मानले जाते. वैष्णन परंपरेनुसार गरुड पुराणात १९ हजार श्लोक आहेत. आधुनिय युगात ८ हजार श्लोक हस्तलिखित स्वरुपात संरक्षित करण्यात आलेले आहेत.
काही विद्वानांचे असेही म्हणणे आहे की, गरुड पुराणाची रचना ही अग्नि पुराणाच्या आधारे करण्यात आलेली आहे. गरुड पुराण हे मानव-पक्षी रुपात असलेल्या गरुडाने भगवान विष्णूंकडून ऐकले आणि त्याने कश्यप ऋषीला ऐकवले. पुढे ते व्यास ऋषीपर्यंत पोहोचले.
Disclaimer: या लेखातील माहिती धार्मिक श्रद्धा आणि धर्मनिरपेक्ष श्रद्धांवर आधारित आहे, जी केवळ सामान्य लोकहितासाठी सादर केली गेली आहे.
संबंधित बातम्या