Garud Puran : हिंदू धर्मातील १८ महापुराणांपैरी गरुड पुराण हे एक महत्त्वाचे पुराण आहे. या पुराणात विविध प्रकारच्या पापांची मृत्यूनंतर नरकात पाठवणी झाल्यानंतर विविध प्रकारची शिक्षा मिळते असे सांगितले गेले आहे. मात्र, जे लोक लैंगिक अत्याचार करतात किंवा महिलांना वाईट नजरेने पाहतात किंवा महिलांचे शोषण करतात अशांना मृत्यूनंतर काय शिक्षा मिळते याचे वर्णनही गरुड पुराणात आढळते. महिलांवर अत्याचार करणारे जेव्हा नरकात जातात तेव्हा अशा व्यक्तीला उकळत्या तेलात टाकले जाते. त्याच प्रमाणे अशा व्यक्तीच्या अंगावर गरम वितळलेले लोखंड ओतले जाते, असे वर्णन गरुड पुराणात आढळते.
जे पुरुष परक्या स्त्रीवर नजर टाकतात किंवा तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आत्म्याला नरकात जावे लागते आणि गरम धगधगत्या लोखंडी खांबाला बिलगून रहावे लागते. मग तो आत्मा त्या पाप केलेल्या क्षणाला विचार करतो त्याला त्याची भयंकर पीडा होते. या शिक्षेमुळे आत्म्याचे संपूर्ण शरीर जळून जाते आणि पुढच्या जन्मात आत्म्याला तरस किंवा सिंह म्हणून जन्म घ्यावा लागतो.
गरुड पुराणात कथन केल्यानुसार, जे अनैतिक पुरुष कुमारी किंवा तरुणीशी संबंध ठेवण्याचे अपवित्र कृत्य करतात, त्यांना पुढच्या जन्मात अजगराची योनी मिळते. नरकात गेल्यावर, यमदूम त्यांना यमराजासमोर आणतो. मग यमराज अशा पाप्यांना सर्वात कठोर शिक्षा देतात. गरुड पुराणात असे म्हटले आहे की नरकात पोहोचल्यानंतर, यमदूत अशा आत्म्यांना उकळत्या तेलात टाकून तळतात आणि त्यांचा भयंकर शारीरिक छळ करतात.
मुलींना गर्भातच मारण्याचे पाप करणाऱ्यांसाठी गरुड पुराणात कठोर शिक्षा सांगितली गेली आहे. अशा लोकांना भ्रूणहत्येचे दोषी मानले जाते. असे पुरुष पुढच्या जन्मात नपुंसक होतात. नरकात, यमदूत अशा पाप्यांना वन्य प्राण्यांसारखे वागवतात आणि जेणेकरून ते त्यांच्या पुढच्या जन्मात असे पाप करण्याचे धाडस करू नयेत अशी कठोर शिक्षा करतात.
जे पुरुष आपल्या मित्राला फसवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या पत्नीशी संबंध ठेवतात, अशा दुष्ट लोकांना यमराज नरकात अतिशय भयंकर अशी शिक्षा देतो. असे लोक, अनेक वर्षे नरकातील यातना सहन केल्यानंतर त्यांना पुन्हा पृथ्वीवर पाठवले जाते. असे लोक गाढवाच्या पोटी जन्माला येतात.
गुरुच्या पत्नी ही शिष्यासाठी आईसमान असते. अशा स्त्रीवर वाईट नजर टाकली तर त्यांना यमराज त्यांच्या पुढच्या जन्मात सरडा बनवतो. जे लोक कामवासनेने ग्रस्त होऊन आपल्या गुरूंच्या पत्नीचा अपमान करतात त्यांना नग्न करून नरकात गरम लोखंडी सळ्यांनी जाळले जाते. अनैसर्गिक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना नरकात जाऊन डुक्कर व्हावे लागते. यमदूताने अनेक वर्षे दिलेले यातना सहन केल्यानंतर, अशा आत्म्याला बैलाची योनी मिळते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या