Garud Puran: या ५ लोकांपासून दूर राहणे चांगले, तुमचे होईल भले, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Garud Puran: या ५ लोकांपासून दूर राहणे चांगले, तुमचे होईल भले, जाणून घ्या

Garud Puran: या ५ लोकांपासून दूर राहणे चांगले, तुमचे होईल भले, जाणून घ्या

Feb 05, 2025 10:06 AM IST

Garud Puran: गरुड पुराण हे हिंदू धर्मातील १८ महापुराणांपैकी एक मानले जाते. गरुड पुराणात सांगितलेल्या नीती आपले भविष्य घडविण्याबरोबरच आपले जीवन सोपे करतात. गरुड पुराणात जीवनापासून मृत्यूनंतरच्या काळाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.

या ५ लोकांपासून दूर राहणे चांगले, तुमचे होईल भले, जाणून घ्या
या ५ लोकांपासून दूर राहणे चांगले, तुमचे होईल भले, जाणून घ्या

Garud Puran: गरुड पुराण हिंदू धर्मातील १८ महापुराणांपैकी एक मानले जाते. गरुड पुराणात सांगितलेल्या नीती आपले भविष्य घडविण्याबरोबरच आपले जीवन सोपे करतात. गरुड पुराणात जीवनापासून मृत्यूनंतरच्या परिस्थितीचे वर्णन करण्यात आलेले आहे. गरुड पुराणात अशा लोकांविषयी सांगण्यात आले आहे, ज्यांचा सहवास टाळणे, त्यांच्यापासून दूर राहण्यातच व्यक्तीचे भले असते. गरुड पुराणानुसार जाणून घेऊ या, आपले नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कोणत्या पाच प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवावे किंवा त्यांच्या पासून दूर राहावे…

नकारात्मक विचारसरणीचे लोक

गरुड पुराणानुसार नकारात्मक विचार असलेल्या लोकांना दूर ठेवावे. अशी माणसे यशात नेहमीच अडथळा ठरतात. अशावेळी जर तुमच्या आजूबाजूला नकारात्मक विचारांचे लोक राहत असतील तर तुम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवावे.

दिखावा करणारे लोक

काही लोक अनेक गोष्टीचा दिखावा करत असतात. हे लोक खरंतर स्वत:चं समाधान करण्यासाठी असं करतात. अनेकदा दिखावा करण्याच्या नादात ते समोरच्या व्यक्तीचे मनही दुखावतात. अशा वेळी अशा लोकांना नेहमीच टाळले पाहिजे. अशा लोकांच्या सहवासात राहिल्याने व्यक्तीचे नुकसानच होत असते.

आळशी लोक

गरुड पुराणानुसार आळशी व्यक्तीपासून दूर राहणे केव्हाही चांगले असते. आळशी माणूस हा स्वत:च्या अपयशाला जबाबदार असतो. पण कधी कधी तो आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडतो. अशा लोकांपासून नेहमीच दूर राहिले पाहिजे, अन्यथा व्यक्तीच्या पदरी अपयश येत जाते.

नशिबावर अवलंबून राहणारे लोक

गरुड पुराणानुसार, कर्माने नव्हे तर नशिबाने जगणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. हे लोक स्वत:चे काम करण्यास टाळाटाळ करतात आणि आजूबाजूच्या लोकांना ही प्रेरणा देतात. असे म्हटले जाते की, कर्माशिवाय नशीब साथ देत नाही. हे लक्षात घेता नशिबावर अवलंबून असणाऱ्यांपासून दूर राहणेच श्रेयस्कर ठरते, असे गरुड पुराण सांगते.

वेळेचा अपव्यय करणारे लोक

गरुड पुराणानुसार निरुपयोगी गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवणाऱ्या लोकांचा सहवास टाळाला पाहिजे. जे लोक आपल्या वेळेचा अपव्यय करतात, ते लोक कोणतेही काम नीट करत नाहीत. असे लोक स्वत:चा वेळ तर वाया घालवतातच, परंतु तुमचाही मौल्यवान वेळ ते निरुपयोगी गोष्टींमध्ये वाया घालवतात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लौकीक मान्यतांवर आधारित आहे, जी केवळ सामान्य लोकांच्या रुचीसाठी सादर करण्यात आली आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा यामागील उद्देश नाही.

Whats_app_banner