Garud Puran : ही कर्मे करणाऱ्याला नरक मिळतो, सहन कराव्या लागतात तीव्र यातना
मराठी बातम्या  /  धर्म  /  Garud Puran : ही कर्मे करणाऱ्याला नरक मिळतो, सहन कराव्या लागतात तीव्र यातना

Garud Puran : ही कर्मे करणाऱ्याला नरक मिळतो, सहन कराव्या लागतात तीव्र यातना

Published Feb 07, 2025 03:32 PM IST

Garud Puran: गरुड पुराण हे एक महत्त्वाचे हिंदू पुराण आहे. मृत्यूनंतर माणसाला नरक आणि स्वर्ग कसा प्राप्त होतो हे या पुराणात सांगण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार व्यक्तीच्या कर्मांवर आधारित, स्वर्ग आणि...

ही कर्मे करणाऱ्याला नरक मिळतो, सहन कराव्या लागतात तीव्र यातना
ही कर्मे करणाऱ्याला नरक मिळतो, सहन कराव्या लागतात तीव्र यातना

Garud Puran: गरुड पुराण हे हिंदू धर्माचे एक महापुराण आहे. मृत्यूनंतर माणसाला नरक आणि स्वर्ग कसा प्राप्त होतो हे या पुराणात सांगण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार मनुष्याच्या कर्मांच्या आधारे स्वर्ग आणि नरक प्राप्त होतात. गरुड पुराणात काही कर्मांना महापाप मानण्यात आले आहे. ही कर्मे करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर नरकात स्थान मिळते. धार्मिक मान्यतेनुसार जिथे माणसाला स्वर्गात सर्व प्रकारचे सुख मिळते, तेथे नरकात अनेक प्रकारचे अत्याचार होतात. जाणून घेऊया कोणत्या कर्मांमुळे व्यक्तीला नरकात जावे लागते...

गरुड पुराणानुसार गर्भ, नवजात आणि गरोदर स्त्री यांचा वध करणाऱ्याला नरकात स्थान मिळते. अशा व्यक्तीला मृत्यूनंतर अनेक प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागते. गर्भ, नवजात अर्भक आणि गरोदर स्त्री यांची हत्या करणे हा जघन्य गुन्हा आहे.

गरुड पुराणानुसार स्त्रीचा अपमान करणाऱ्याला नरकात स्थान मिळते. अशा व्यक्तीला मृत्यूनंतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

गरुड पुराणानुसार फसव्या लोकांनाही नरकात स्थान मिळते. श्रद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे. एखाद्याचा विश्वास तोडणे हा गंभीर गुन्हा आहे.

गरुड पुराणानुसार दुर्बल आणि गरिबांचे कधीही शोषण करू नये. असे करणाऱ्यांना मृत्यूनंतर अनेक प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागते. जे इतरांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात, त्यांनाच स्वर्गाचा मार्ग मोकळा होतो.

गरुड पुराणानुसार अशा लोकांनाही नरकात स्थान मिळते जे आपल्या सुखासाठी इतरांना त्रास देतात. इतरांना दु:खी करण्यासाठी आपण कधीही काहीही करू नये.

गरुड पुराणानुसार मंदिरांची, धार्मिक ग्रंथांची खिल्ली उडवणाऱ्यांना मृत्यूनंतर नरकात स्थान मिळते. मंदिरे, धार्मिक ग्रंथ यांचा नेहमी आदर केला पाहिजे.

गरुड पुराण

गरुड पुराण हा ग्रंख हिंदू धर्मातील १८ महापुराणांपैकी एक आहे. या ग्रंथात एकूण १९ हजार श्लोक असून त्यापैकी ७ हजार श्लोक लोकांच्या जीवनाशी संबंधित आहेत. त्यात नरक, स्वर्ग, गूढ, नीती, धर्म, ज्ञान यांचा उल्लेख आहे. या ग्रंथाचे पठण केल्याने लोकांना ज्ञान, त्याग, तप, आत्मज्ञान आणि सद्गुणांचे ज्ञान होते, अशी मान्यता आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती गरुड पुराण या ग्रंथातून घेण्यात आलेली आहे. यातील तथ्यांबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. त्याच प्रमाणे यातून कोणत्याही अंधश्रद्धेला देखील आम्ही खतपणी घालत नाही,किवा दुजोराही देत नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Sunil Madhukar Tambe

eMail

Whats_app_banner