मराठी बातम्या  /  Religion  /  Ganpatila Modak Ka Aavadtat

Ganesh Jayanti 2023 : गणपतीला मोदकाचाच नैवेद्य का दिला जातो?, काय आहे त्यामागची कहाणी?

गणपतीला मोदक का प्रिय असतात
गणपतीला मोदक का प्रिय असतात (हिंदुस्तान टाइम्स)
Dilip Ramchandra Vaze • HT Marathi
Jan 25, 2023 10:09 AM IST

Why Ganpati Likes Modak : गणपतीबाप्पाला कोणत्याही प्रसंगी नैवेद्यामध्ये एक पदार्थ आवर्जुन दिला जातो, तो पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. हे मोदक श्रीगणेशाला अत्यंत प्रिय आहेत.

Why Ganpati Likes Modak

ट्रेंडिंग न्यूज

आज गणेश जयंती अर्थात भगवान श्रीगणेश यांचा वाढदिवस आहे. आज घरांमध्ये गणराय विराजमान झाले आहेत. मात्र गणपतीबाप्पाला कोणत्याही प्रसंगी नैवेद्यामध्ये एक पदार्थ आवर्जुन दिला जातो, तो पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. हे मोदक श्रीगणेशाला अत्यंत प्रिय आहेत. मात्र मोदकच गणपती बाप्पाला का प्रिय आहेत, हे माहिती आहे का. गणरायांना नैवेद्याच्या स्वरुपात अर्पण केल्या जाणाऱ्या मोदकामागेही एक कहाणी आहे.

 

त्याचं झालं असं की भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांच्याशी झालेल्या युद्धात गणेशाचा एक दात तुटला होता. त्यामुळे त्यांना जेवताना खूप त्रास व्हायचा. या कारणास्तव त्याच्यासाठी स्वादिष्ट लाडू आणि मोदक बनवले जायचे, जे तोंडात वितळायचे. यानंतर मोदक विघ्नहर्ता गणपतीला अतिशय प्रिय झाले. यामुळेच त्यांना मोदक आणि लाडू नक्कीच दिले जातात.

गणेश चतुर्थीला मोदकांचे महत्त्व

मोदक म्हणजे आनंद, म्हणून तो खाल्ल्यानंतर माणूस आनंदी होतो. वास्तविक सुखाला मराठीत मोदक म्हणतात. मोदक बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. सर्वात लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध पद्धत म्हणजे तांदळाच्या पीठात खोबरं, गूळ,वेलची पूड भरले जातात आणि वाफवले जातात. मग हे मोदक फोडून तूपाच्या धारेच्या घमघमाटात खाल्ले जातात.

गणेश जयंती पूजा विधी

गणेश जयंतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करावे. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत करावे. यानंतर गणेशाची आराधना सुरू करा. लाकडी चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पसरवून गणपतीची मूर्ती ठेवा. यानंतर पाण्याने आचमन करून गणपतीला फुले, हार, कुंकू, हळद, अक्षता इत्यादी अर्पण करा. यानंतर तुमच्या श्रद्धेनुसार देवाला बुंदीचे लाडू, मोदक किंवा प्रसाद अर्पण करा.

त्यानंतर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून मंत्र, स्तोत्र इत्यादींचे यथायोग्य पूजन करावे. शेवटी कुटुंबासमवेत आरती करावी आणि झालेल्या चुकीची माफी मागावी.

विभाग