Ganeshotsav : गणपती बाप्पाच्या सोंडेची दिशा काय सांगते? जाणून घ्या विविध मान्यता आणि महत्व
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ganeshotsav : गणपती बाप्पाच्या सोंडेची दिशा काय सांगते? जाणून घ्या विविध मान्यता आणि महत्व

Ganeshotsav : गणपती बाप्पाच्या सोंडेची दिशा काय सांगते? जाणून घ्या विविध मान्यता आणि महत्व

Published Sep 10, 2024 07:00 PM IST

Ganpati Bappa Interesting Facts : गणेश मूर्तींमध्ये काही गणपती बाप्पाची सोंड उजव्या दिशेला असते तर काही डाव्या दिशेला असते. जाणून घेऊया गणपती बाप्पाच्या सोंडेची दिशा नेमकं काय सांगते.

गणपती बाप्पाच्या सोंडेची दिशा काय सांगते
गणपती बाप्पाच्या सोंडेची दिशा काय सांगते

गणेशोत्सव सुरू आहे. गणपती बाप्पा आराध्य दैवत आहे. प्रथम पूजनीय मानले जाणाऱ्या गणपती बाप्पासंबंधी अनेक कथा प्रचलीत आहेत. गणपती बाप्पाची अनेक नावे आहेत, गणपती बाप्पाच्या स्वरूपासंबंधी अनेक रहस्य सांगितले जातात. तसेच गणपती बाप्पाच्या सोंडेसंबंधी देखील अनेक मत-मतांतरे सांगितले गेली आहेत.

गणपतीची सोंड एका बाजूला वळलेली असल्याने त्याला वक्रतुंडा देखील म्हणतात. श्रीगणेशाच्या वक्रतुंड स्वरूपामध्ये अनेक भेद आहेत. काही मूर्तींमध्ये गणेशाची सोंड डावीकडे वळताना दाखवली आहे. तर काही उजवीकडे वळताना दाखवले आहेत. याबद्दल जाणून घेऊया.

उजव्या सोंडेचा गणपती

हे पिंगला नाडीशी निगडीत म्हणजे पौरुष उर्जेचे प्रतीक आहे. अशा गणेशाला दक्षिणामूर्ती असेही म्हणतात. ते सिद्धी आणि आध्यात्मिक साधनेचे प्रतीक आहेत, म्हणून त्यांना सिद्धीविनायक असेही म्हणतात. ज्यांना सामाजिक शक्ती वाढवायची आहे.

उजव्या सोंडेचा गणपती याचाच अर्थ दक्षिणाभिमुख मूर्ती होय. दक्षिण याचा अर्थ असा की उजवी बाजू किंवा दक्षिण दिशा. ही दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची असते. यमलोकाच्या दिशेला तोंड देण्याची ताकद या गणपतीमध्ये असते. त्याची सूर्यनाडी सुरु असल्याने तो तेजस्वीही असतो. असे सांगतात की दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप-पुण्याचा लेखाजोखा केला जाते. त्यामुळे ही बाजू नकोशी असते. महत्त्वाचे म्हणजे दक्षिणाभिमुख गणपतीची पूजा नेहमी केली जात नाही. तसेच, या गणपतीची पुजा करताना पूजाविधीचे सर्व नियम काटेकोर पाळणे आवश्यक असते. 

डाव्या सोंडेचा गणपती

हे इडा नाडीशी निगडीत असून शरीराच्या चंद्र प्रणालीवर परिणाम करते. हे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. अशाच प्रकारची गणेशमूर्ती बहुतांश घरामध्ये आढळते. हे मानसिक शीतलता, सुख आणि आनंदाचे प्रतीक आहे.

डाव्या सोंडेच्या गणपतीस वाममुखी गणपती असेही म्हटले जाते. वाम याचाच अर्थ डावी दिशा किंवा उत्तर बाजू. डावी बाजू ही उजव्या बाजूच्या विरुद्ध दिशेस येते. डाव्या बाजूला चंद्रनाडी असते. ती शीतलता देते. उत्तर बाजू ही अध्यात्माला पूरक असते असे मानतात. त्यामुळेच वाममुखी गणपती पूजेसाठी ठेवण्यास प्राधान्य असते. या गणपतीची मात्र नियमीत पूजा केली जाते. डाव्या सोंडेच्या गणपतीसाठी कुठलेच विशेष नियम नसतात. त्यामुळे घरी गणपतीची प्रतिष्ठापना करताना डाव्या सोंडेची मूर्तीला प्राधान्य देण्यात येते.

सरळ सोंडेचा गणपती

सुषुम्ना नाडीशी संबंधित हे रूप ऊर्जा संतुलित करण्याचे प्रतीक आहे. यांचे उपासकही संतुलनाची इच्छा करतात.

वरच्या सोंडेचा गणपती

वरच्या बाजूला सोंड असलेले गणेश अध्यात्म जागृत करणारे मानले जातात. हे उच्च कुंडलिनी शक्ती जागृत करतात.

Whats_app_banner