Ganpati Mandir : ऐतिहासिक दंडपाणेश्वर मंदिर, या शिवकालीन गणपती मंदिराला तुम्ही भेट दिली का?-ganpati festival 2024 shri dandapaneshwar mandir nandurbar maharashtra history ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ganpati Mandir : ऐतिहासिक दंडपाणेश्वर मंदिर, या शिवकालीन गणपती मंदिराला तुम्ही भेट दिली का?

Ganpati Mandir : ऐतिहासिक दंडपाणेश्वर मंदिर, या शिवकालीन गणपती मंदिराला तुम्ही भेट दिली का?

Sep 11, 2024 04:48 PM IST

Dandapaneshwar Ganpati Temple : दंडपाणेश्वर गणपती मंदिराला नवसाला पावणारा गणपती बाप्पा अशी ख्याती असून, गणेशोत्सवात तुम्ही या गणपती मंदिराला भेट देऊ शकतात. जाणून घेऊया या मंदिराचे वैशिष्ट्य आणि हे मंदिर कुठे आहे.

दंडपाणेश्वर गणपती मंदिर, नंदुरबार
दंडपाणेश्वर गणपती मंदिर, नंदुरबार

गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. ७ सप्टेंबर चतुर्थीला सुरू झालेला हा गणेशोत्सव १७ सप्टेंबर रोजी चतुर्दशीला गणेश विसर्जनाने समाप्त होईल. सर्वीकडे प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. अनेक सार्वजनिक मंडळात डोळ्याचे पारणे फेडतील अशा गणेश मुर्तींची स्थापना करण्यात आली असून, आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. तर अनेक गणपती मंदिरेही नयनरम्य सजवली आहेत.

गणेशोत्सवा दरम्यान भाविक प्रसिद्ध, ऐतिहासिक आणि इच्छापूर्ती होईल अशा विविध गणपती मंदिरांना भेट देतात आणि मोठ्या गणेश मुर्ती किंवा मानाचे गणपती पाहण्यासाठी जात असतात. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा आगळा-वेगळा उत्साह बघायला मिळतो. गणेशोत्सवात तुम्ही या गणपती मंदिराला भेट देऊ शकतात, जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास आणि हे मंदिर कुठे आहे.

नंदुरबार हे आदिवासींचे शहर म्हणून ओळखले जात असले तरी, या भूमीला ऐतिहासिक, धार्मिक महत्व आहे. नंदुरबार हे नंद गवळी राजा यांची नगरी असल्याचे जाणकार सांगतात, येथे राज्याचा दरबार भरत असे, त्याला नंद दरबार असे म्हटले जात असे त्याचा अपभ्रंश होऊन नंदुरबार हे नाव पडल्याचे सांगितले जाते. नंदुरबार शहरातच दंडपाणेश्र्वर हे प्राचीन गणपती मंदिर असून, ते जागृत देवस्थान म्हणुन ओळखले जाते. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात चतुर्थी आणि गणेशोत्सवात फार गर्दी पाहायला मिळते.

नंदुरबार या शहराचा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि पतंगोत्सव राज्यभर प्रसिद्ध आहे. खोडियार माता, कल्याणेश्वर महादेव, काला नंदी, गणपती मंदिर, दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थांचा मठ यासह विविध धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे नवसाला पावणारा आणि जागृत देवस्थान अशी मान्यता असलेला हा दंडपाणेश्वरचा गणपती होय. हे दंडपाणेश्वर मंदिर पूर्वी शहराबाहेर होते, परंतु आता वाढणारी वस्ती आणि लोकसंख्या यामुळे मुख्य रस्त्याला हे मंदिर आहे.

मंदिराची अख्यायिका आणि इतिहास

दंडपाणेश्वर हे मंदिर शिवकालीन आहे. असे सांगितले जाते की, छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी येथे असलेल्या जंगलात आपल्या सैन्यांसह मुक्कामी थांबले होते. गणपतीची मूर्ती भगव्या रंगाची असून तिला चांदीच्या थरांनी सजवलेले आहे. गणपती मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे. आजुबाजूचा परिसर मोठा प्रशस्त आणि मोकळा असून, लहान मुलांना खेळण्यासाठी येथे बगीचाही आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती पसरल्यामुळे या मंदिरातली गर्दी वाढू लागली आहे.

Whats_app_banner
विभाग