Ganesh Visarjan : उद्या ५ दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन, जाणून घ्या शुभ मुहूर्त-ganpati festival 2024 ganesh visarjan 11 september shubh muhurta ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ganesh Visarjan : उद्या ५ दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Ganesh Visarjan : उद्या ५ दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Sep 10, 2024 12:48 PM IST

Ganesh Visarjan Muhurat : काही भक्त गणपती बाप्पाला दीड दिवसाने, तिसऱ्या दिवशी, पाचव्या किंवा सातव्या दिवशी निरोप देतात. तुम्हीही ११ सप्टेंबरला म्हणजेच पाचव्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देणार असाल तर जाणून घ्या गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त -

गणेश विसर्जन २०२४ मुहूर्त
गणेश विसर्जन २०२४ मुहूर्त

Ganesh Visarjan Shubh Muhurat on 11 September 2024 : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत होते, १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी परंपरेनुसार दीड दिवसाचा, ३ दिवस, ५ दिवस, ७ दिवस आणि १० दिवस गणेशाची पूजा करतात. गणपतीची पूजा केल्यानंतर गणेश विसर्जन केले जाते. हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेचे विधी पूर्ण झाल्यानंतरच विसर्जन किंवा उद्यापन होते. 

गणेश विसर्जन चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दीड दिवसांनी केले जाते. याशिवाय तिसऱ्या दिवशी, पाचव्या किंवा सातव्या दिवशीही गणेश विसर्जन करता येते. विसर्जनाचा सर्वात लोकप्रिय दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. चतुर्थीनंतरचा ११वा दिवस आहे. 

५व्या दिवशीच्या गणेश विसर्जनाचा मुहूर्त

११ सप्टेंबर २०२४ रोजी बुधवारी ५व्या दिवशेचे गणेश विसर्जन होईल. या दिवशीही अनेकजण मोठ्या थाटामाटात बाप्पाला निरोप देतात. गणपती बाप्पाचे स्वागत जसे वाजत-गाजत करतात तसेच विसर्जनही वाजत-गाजत करतात. पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करणार असाल तर जाणून घ्या गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त-

११ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश विसर्जनासाठी चौघडिया शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून ३ मिनिटे ते ९ वाजून १० मिनिटापर्यंत असेल. यानंतर सकाळी १० वाजून ४३ मिनिटे ते दुपारी १२ वाजून १७ मिनिटापर्यंत असेल. दुपारी शुभ मुहूर्त ३ वाजून २३ मिनिटे ते सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटापर्यंत असेल.

सातव्या दिवशी गणेश विसर्जन

गणेश विसर्जन सातव्या दिवशी म्हणजे शुक्रवार, १३ सप्टेंबर २०२४ रोजीही करता येईल.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाचे महत्व – 

अनंत चतुर्दशीचा दिवस गणेश विसर्जनासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. चतुर्दशी तिथीच्या दिवशी भगवान विष्णूची त्यांच्या अनंत रूपात पूजा केली जाते. देवाची पूजा करताना हातावर धागा बांधला जातो. हा धागा भक्ताचे संकटापासून रक्षण करतो असे मानले जाते. याला अनंत किंवा अनंती असे म्हणतात.

अनंत चतुर्दशी २०२४ कधी आहे- 

यावर्षी अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर २०२४ रोजी आहे. या दिवशी उपवासही केला जातो. 

गणपती विसर्जनाच्या वेळी तुम्ही या मंत्राचा जप करू शकता - 

ॐ यान्तु देवगण: सर्वे पूजामदया ममकीम. इष्टकामस्मृद्ध्यर्थ पुनरपि पुनरगमनाय च । 

किंवा 

गं गणपतयै नमः या मंत्राचा जप करता येईल.

गणेश उत्सवाचे हे दहा दिवस खूप खास असतात. या काळात लोक देवाला प्रसन्न करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. श्रीगणेशाची आराधना केल्याने त्यांचा विशेष आशीर्वादांचा वर्षाव होतो आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

 

Whats_app_banner
विभाग