‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ याच जयघोषात दहा दिवसांनी बाप्पााला निरोप दिला जाणार आहे. भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होणारा गणेश चतुर्थीच्या या सणाला विशेष महत्त्व आहे. मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून, गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत दहा दिवसांच्या गणपतींना मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे.
गणपती बाप्पा जसे वाजत-गाजत येतात तसेच धूमधडाक्यात जातात. लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली असून, सार्वजनिक मंडळात सत्यणारायण पूजा आणि भंडाराचा आस्वाद भाविक चाखत आहे. बाप्पाचं विसर्जन करताना मन अतिशय निराश होतं, पण परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते. यासाठीच हे खास गणेश विसर्जनानिमित्त काही संदेश प्रियजणांना पाठवा आणि बाप्पाला निरोप द्या.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,
निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा…
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या
…
रिकामे झाले घर,
रिकामा झाला मखर,
पुढच्या वर्षी पुन्हा घरी येण्या
थाटामाटात निघाला माझा लंबोदर
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या.
…
निरोप देतो देवा आज्ञा असावी,
चुकले आमचे काही देवा क्षमा असावी…
गणपती बाप्पा मोरया
…
गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला
बाप्पा बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.
…
आभाळ भरलं होतं तू येताना,
आता डोळे भरून आलेत तुला निरोप देताना…
गणपती बाप्पा मोरया
…
तुझा चमत्कार दाखवण्यासाठी,
पुढच्या वर्षी आर्शीवाद देण्यासाठी…
बाप्पा लवकर ये…
…
गणेश विसर्जनाच्या दिवशी
सर्व भक्तांच्या आयुष्यातील वेदना,
दु:ख कमी होवो…
हिच बाप्पा चरणी प्रार्थना
…
सेवा जाणुनी, गोड मानुनी,
द्यावा आर्शीवाद आता,
निरोप घेतो देवा आता
पुढच्या वर्षी लवकर या…
…
गणराया तुजविन विनवू कोणाला,
तुच कृपाळा दैवत माझे..
पुन्हा ये भक्ता या ताराया…
गणपती बाप्पा मोरया
…
जडलाय तुझ्या रूपाचा ध्यास,
पूर्ण कर भक्ताची आस,
आर्शीवादासह घेतोय निरोप,
पुढच्या वर्षी करीन आणखी सुंदर आरास..
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
…
आमच्या मनी फक्त तुझीच भक्ती,
निरोप देतो आता...
पुढच्या वर्षी लवकर या मंगलमूर्ती
…
येतोस तू वाजत गाजत बाप्पा
जातोस ही मोठ्या धूमधडाक्यात
सर्वांचा बाप्पा लाडका
आमच्या मनामनात वसलेला
हॅपी गणेश विसर्जन