मराठी बातम्या  /  Religion  /  Ganpati Bappa Pooja Sahitya Vidhi And Mantra In Marathi See Details

Ganesh Chaturthi 2023 : लाडक्या बाप्पाचं घरात असं करा स्वागत; पाहा मुहूर्त आणि धार्मिक विधी

Ganesh Chaturthi 2023 Mumbai Live
Ganesh Chaturthi 2023 Mumbai Live (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Sep 18, 2023 01:04 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : बाप्पा बुद्धीचा देवता मानला जातो. गणरायाची प्रतिष्ठापना करताना आणि पूजाविधी करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

Ganesh Chaturthi 2023 Mumbai Live : उद्यापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी अनेकांनी गणेशमूर्ती आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह पुण्यातील गणेशभक्तांमध्ये गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. परंतु आता बाप्पाचं घरात स्वागत करत असताना भाविकांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागत असते. तसेच उद्या म्हणजेच मंगळवारी गणरायाची प्रतिष्ठापना करताना विधी आणि योग्य मुहूर्त कोणता?, याबाबतची माहिती जाणून घेवूयात.

ट्रेंडिंग न्यूज

सर्वात चांगला मुहूर्त कोणता?

गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची सर्वात शुभ वेळ ही सकाळची आहे. सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गणेशाच्या मूर्तीची तुम्ही घरात प्रतिष्ठापना करू शकता. त्यापूर्वी आपल्या घराची चांगल्या प्रकारे स्वच्छता करायला हवी. अंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून देव्हाऱ्याची स्वच्छता करूनच बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायला हवी. त्यानंतर पूजेच्या साहित्य देव्हाऱ्यात ठेवायला हवं. पूजा करत असताना तुमचा चेहरा पूर्व दिशेला असायला हवा. याची विशेष काळजी घ्यायला हवी.

गणेशमूर्तीची घरात प्रतिष्ठापना करताना मूर्तीचं तोंड उत्तरेला असायला हवं. मूर्तीला स्थापित करण्यापूर्वी त्याच्या खाली लाकडी पाट, गहू, मूग, आणि लाल कपडे टाकायला हवे. मूर्तीचं पंचामृतानं स्नान केल्यानंतरच त्याला देव्हाऱ्यात ठेवा. त्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवून पूजेला सुरुवात करायला हवी. गणपतीला सुंदर कपडे, जानवं, चंदन, दूर्वा, फळं, पिवळी फुलं, आणि पेढ्यांचा नैवेद्य द्यायला हवा. त्यानंतर पूजेची सुरुवात करावी.

आरती करताना कोणते मंत्र म्हणाल?

गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारु भक्षणमं। उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम।।

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)