मराठी बातम्या  /  धर्म  /  Ganga Dussehra : गंगा दशहऱ्याला २३ वर्षानंतर खास योग; जाणून घ्या पूजा- विधि, शुभ मुहूर्त, महत्व, मंत्र आणि आरती

Ganga Dussehra : गंगा दशहऱ्याला २३ वर्षानंतर खास योग; जाणून घ्या पूजा- विधि, शुभ मुहूर्त, महत्व, मंत्र आणि आरती

Jun 16, 2024 11:16 AM IST

Ganga Dussehra 2024 : आज रविवाव १६ जून रोजी गंगा दशहरा आहे. या दिवशी खास योग-संयोग आहे. शुभ संयोगात गंगा दशहऱ्याच्या दिवशी गंगेची पूजा आणि स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील.

गंगा दशहरा २०२४
गंगा दशहरा २०२४

ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला रविवारी गंगा दसरा साजरा केला जाणार आहे. या दिवशी सनातनी धर्माचे भक्त गंगेत स्नान करतात, पूजा करतात आणि दान करतात. लोक विशेषत: ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आपल्या घरात स्नान करून गंगा मातेची पूजा करतील. या दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती असे मानले जाते. या दिवशी प्रभू रामाने दक्षिणेला रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. या दिवशी भगवान भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते.

रविवारी उदया तिथीनुसार गंगा दशहरा

ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी १६ जून रोजी पहाटे २ वाजून ३२ मिनिटापासून सुरू होईल आणि ब्रह्मबेलामध्ये १७ जून रोजी पहाटे ४ वाजून ४३ मिनिटापर्यंत चालेल. १६ जून रोजी गंगा दसरा साजरा होणार आहे. गंगा दसऱ्याच्या दिवशी हस्त नक्षत्र सकाळी ११.१३ पर्यंत राहील. हा काळ गंगा नदीत स्नान करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

२३ वर्षांनी दोन महायोग

यावेळी चित्रा नक्षत्र आणि पंच महायोगात २३ वर्षांनंतर गंगा दसरा साजरा केला जाणार आहे. शंभर वर्षांनंतर कुंभ राशीत स्थित शनिदेव शश राजयोग तयार करतील. याशिवाय गंगा दसऱ्याच्या दिवशी अमृत सिद्धीयोग, सर्वार्थ सिद्धीयोग देखील असतो जो अत्यंत शुभ आहे. हिंदू धर्मात ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. 

गंगास्नानाने दहा पापांचा नाश होतो

धार्मिक श्रद्धेनुसार, गंगेत स्नान केल्याने माणसाची सर्व पापे धुऊन जातात. सुख-समृद्धीचे आशीर्वादही मिळतात. धर्मग्रंथात गंगा मातेला मोक्षदाता म्हटले आहे. भगवान शिवाच्या जटामधून गंगा उगम पावते, म्हणून या दिवशी भगवान शिवाचीही पूजा करावी. यामुळे विशेष फायदा होतो. या दिवशी गंगा स्नान केल्याने १० पापांचा नाश होतो असे म्हटले जाते.

गंगा दसरा पूजन पद्धत

गंगेत स्नान करावे. ज्यांना गंगास्नानाला जाता येत नाही त्यांनी घरीच राहून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे आणि गंगा मातेचे ध्यान करावे. घराच्या मंदिरात दिवा लावावा. या दिवशी गंगा मातेचे जास्तीत जास्त ध्यान करावे. या दिवशी दान केल्याने शुभ फळ मिळते. घरात राहून गंगा मातेची आरती करावी.

गंगा माता मंत्र

त्रिपुरारिशिरश्चारि पापहारि पुनातु मां ।। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु।। ॐ पितृगणाय विद्महे जगत धारिणी धीमहि तन्नो पितृो प्रचोदयात्।।

गंगा मातेची आरती

जय देवी जय देवी गंगाबाई ।

पावन करि मन सत्वर विश्वाचे आई ।।

 

माते दर्शनमात्रे प्राणी उद्धरसी ।

हरिसी पातक अवघष जग पावन करिसी ।।

दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी ।

हरहर आता स्मरतो गति होईल कैसी ।।

 

पडले प्रसंग तैशी कर्मे आचरलो ।

विषयांचे मोहाने त्यातचि रत झालो ।।

ज्याचे योगे दुष्कृत-सिंधुत बुडालो ।

त्यातुतिन मजला तारिसि ह्या हेतूने आलो ।।

 

निर्दय यमदूत नेती त्या समयी राखी ।

क्षाळी यमधर्माच्या खात्यातील बाकी ।।

मत्संगतिजन अवघे तारियले त्वा की ।

उरलो पाहे एकचि मी पतितांपैकी ।।

 

अघहरणे जय करुणे विनवितसे भावे ।

नोपेक्षी मज आता त्वत्पात्री घ्यावेम ।।

केला पदर पुढे मी, मज इतुके द्यावे ।

जीवे त्या विष्णूच्या परमात्मनि व्हावे ।।

 

WhatsApp channel