Ganesh Mahotsav 2024 : गणेश उत्सवात तुम्हाला स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर त्याचा अर्थ काय? जाणून घ्या-ganesh mahotsav 2024 according to swapna shastra seeing these things in your dreams connect to prosperity check details ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ganesh Mahotsav 2024 : गणेश उत्सवात तुम्हाला स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर त्याचा अर्थ काय? जाणून घ्या

Ganesh Mahotsav 2024 : गणेश उत्सवात तुम्हाला स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर त्याचा अर्थ काय? जाणून घ्या

Sep 06, 2024 10:08 PM IST

Ganesh Mahotsav 2024 Auspicious Sign : स्वप्न शास्त्रानुसार गणेश महोत्सवादरम्यान जर तुम्हाला स्वप्नात बाप्पा दिसला तर तुम्हाला प्रसन्न होण्याच गरज आहे. कारण ते खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तसेच घरात सुख-समृद्धी नांदेल.

Ganesh Mahotsav 2024 : गणेश उत्सवात तुम्हाला स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर त्याचा अर्थ काय? जाणून घ्या
Ganesh Mahotsav 2024 : गणेश उत्सवात तुम्हाला स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर त्याचा अर्थ काय? जाणून घ्या

देशात गणेश चतुर्थी किंवा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. गणेश उत्सवात गणेशाची पूजा करण्याची आणि त्यांच्यासाठी उपवास करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार, यावर्षी हा गणेश चतुर्थी ६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

अशा स्थितीत, गणे्श उत्सवाच्या काळात जर तुम्हाला स्वप्नात काही विशिष्ट गोष्टी दिसत असतील तर स्वप्न शास्त्रानुसार त्याचा विशेष अर्थ असू शकतो.

श्रीगणेशाचे दर्शन

स्वप्न शास्त्रानुसार गणेश महोत्सवादरम्यान जर तुम्हाला स्वप्नात बाप्पा दिसला तर तुम्हाला प्रसन्न होण्याच गरज आहे. कारण ते खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तसेच घरात सुख-समृद्धी नांदेल.

कलश -

जर तुम्हाला स्वप्नात कोणतेही पूजा कलश पाण्याने भरलेले दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे. वास्तविक कलश हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात पैशाची समस्या संपणार आहे. याशिवाय गणेश महोत्सवात स्वप्नात हत्ती, उंदीर आणि मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते.

दुर्वा -

गणेश उत्सवादरम्यान जर तुम्ही स्वप्नात श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करताना पाहिले तर ते खूप शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की व्यक्तीच्या जीवनात लवकरच सुख आणि समृद्धी येणार आहे. त्याच्यावर गणेशाच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे.

गणेश प्रतिष्ठापना शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, सकाळी ११:०३ ते दुपारी १:३४ या वेळेत गणेशाची प्रतिष्ठापना केली जाईल. या दिवशी पहाटे ७:४५ ते ९:१८ या वेळेत पूजा होईल. यासोबतच सायंकाळी ६:३७ ते ८:०४ या वेळेत सायंकाळची पूजा होईल. बाप्पाच्या पूजेसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो.

Whats_app_banner