मराठी बातम्या  /  religion  /  Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा संदेश
गणेश जयंतीनिमित्त द्या शुभेच्छा
गणेश जयंतीनिमित्त द्या शुभेच्छा (हिंदुस्तान टाइम्स)

Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा संदेश

25 January 2023, 7:47 ISTDilip Ramchandra Vaze

Ganesh Jayanti Wishes : तुमच्या काही प्रियजनांना श्रीगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्याव्या असं वाटत असेल तर तुमच्यासाठी अशाच काही निवडक शुभेच्छा आम्ही घेऊन आलो आहोत.

श्रीगणेश जयंतीनिमित्त शुभेच्छा २५ जानेवारी २०२३

ट्रेंडिंग न्यूज

घराघरात गणराय विराजमान झाले आहेत. आज श्रीगणेशाचा जन्म दिवस अर्थात वाढदिवस आहे. आज प्रत्येक घरात आनंदाचं वातावरण गणपती बाप्पा घेऊन आले आहेत. घरात शेजाऱ्यांची, येणाऱ्या पाहुण्यांची अगदी रेलचेल असेल. अशात तुमच्या काही प्रियजनांना श्रीगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्याव्या असं वाटत असेल तर तुमच्यासाठी अशाच काही निवडक शुभेच्छा आम्ही घेऊन आलो आहोत. मग पाठवा आपल्या प्रियजनांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा.

 

।। ॐ गं गणपतये नमः ।।

माघी गणेश जयंती निमित्त

सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा

 

 

मोदकांचा केला प्रसाद, केला लाल फुलांचा हार

सजवलं मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके असो..

माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.

 

“सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,

सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो

हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”

गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !

 

“श्री गणेशाय नमः ”

“सर्व प्रिय भक्तांना श्रीगणेश जयंतीच्या

हार्दिक हार्दिक शुभेच्छा.”

 

वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ!

निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा…

हैप्पी गणेश चतुर्थी!

विभाग