Ganesh Chaturthi 2023 : आज अवघ्या महाराष्ट्रासह देशात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. हा सण देशातील बहुतांश राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या उत्सवासाठी तसेच पूजा आणि सजावटीचे साहित्य खरीदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. मुंबईसह पुण्यातील गणेशभक्तांमध्ये गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासून घरगुती गणरायाच्या स्वागतासाठी लगबग सुरू आहे. आज गणरायाची प्रतिष्ठापना करताना विधी आणि योग्य मुहूर्त कोणता?, याबाबतची माहिती जाणून घेवूयात.
हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही १८ सप्टेंबरला दुपारी १२.३९ वाजता सुरू होणार आहे. ही तिथी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १.४३ पर्यंत राहणार आहे. त्यामुळे सकाळी ते दुपारी २ या कालावधीत गणारायाची स्थापना करता येऊ शकणार आहे. यावर्षी उदयतिथी वैध असल्याने, यावर्षी गणेश चतुर्थी ही मंगळवारी (दि १९) साजरी केली जाणार आहे. गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ११.०१ ते दुपारी १:२८ दरम्यान असून या वेळेत गणारायाची प्रतिष्ठापणा करता येणार आहे. त्यापूर्वी आपल्या घराची चांगल्या प्रकारे स्वच्छता करायला हवी. अंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून देव्हाऱ्याची स्वच्छता करूनच बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायला हवी. त्यानंतर पूजेच्या साहित्य देव्हाऱ्यात ठेवायला हवं. पूजा करत असताना तुमचा चेहरा पूर्व दिशेला असायला हवा. याची विशेष काळजी घ्यायला हवी.
श्रीगणेशाचा जन्म मध्यान्हकाळात झाल्याने दुपारची वेळ गणेशपूजेसाठी शुभ आहे. मध्य मुहूर्तामध्ये, भक्त पूर्ण विधींनी गणेशपूजा करतात, या पूजेला षोडशोपचार गणपती पूजा म्हणतात.
गणेशमूर्तीची घरात प्रतिष्ठापना करताना मूर्तीचं तोंड उत्तरेला असायला हवं. मूर्तीला स्थापित करण्यापूर्वी त्याच्या खाली लाकडी पाट, गहू, मूग, आणि लाल कपडे टाकायला हवे. गणरायाच्या स्थापनेसाठी घराची पूर्ण स्वच्छता करा. ज्या जागेवर गणपती स्थापन केला जाणार आहे, त्या जागेवर गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून शुद्ध करा. चौरंगावर लाल रंगाचे कापड पसरवा आणि ते तसेच ठेवा. यानंतर श्री गणेशाची मूर्ती चौरंगावर बसवा. गणपतीला स्नान करून गंगाजल शिंपडा. रिद्धी-सिद्धीचे चिन्ह म्हणून मूर्तीच्या दोन्ही बाजूला एक एक सुपारी ठेवा. गणेशाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेले भांडे ठेवा. यानंतर हातात अक्षता आणि फुले घेऊन गणपती बाप्पाचे ध्यान करा. मूर्तीचं पंचामृतानं स्नान केल्यानंतरच त्याला देव्हाऱ्यात ठेवा. त्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवून पूजेला सुरुवात करायला हवी. गणपतीला सुंदर कपडे, जानवं, चंदन, दूर्वा, फळं, पिवळी फुलं, आणि पेढ्यांचा नैवेद्य द्यायला हवा. त्यानंतर पूजेची सुरुवात करावी.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या