Ganeshotsav 2024 : गणेश भक्तांसाठी गणेशोत्सवाचे दहा दिवस मोठ्या जल्लोषाचे असतात. सर्वत्र बाप्पाचे देखणे रूप पाहायला मिळते. घरात आणि अवतीभोवती वातावरण प्रसन्न होऊन जातं. या वर्षी शनिवार ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून, १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दहा दिवसात गणपती बाप्पाचा आपल्या सोबतचा थाट मंत्रमुग्ध करणारा ठरतो.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. याला विनायक चतुर्थी , विनायक चवथी किंवा गणेशोत्सव असेही म्हणतात. महाराष्ट्रासह देश विदेशात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. प्रियजणांसोबत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हे शुभेच्छा संदेश उपयोगी ठरतील.
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
…
सुखकर्ता, वरदविनायक,
गणरायाच्या आगमनाने होतो
प्रसन्न सारा आसमंत
अशा या बाप्पाच्या आगमनाच्या
आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
…
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
…
श्रीगणेशाच्या दिव्य उपस्थितीने तुमच्या घरात शांती आणि आनंद नांदो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
…
तुमची गणेश चतुर्थी आशीर्वादाने,
स्वादिष्ट मोदकांनी आणि
आनंदाच्या क्षणांनी भरलेली जावो.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
…
रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
…
चला गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करूया
उत्सवानिमित्त प्रियजणांना शुभेच्छा देऊया
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
…
तुमचे जीवन उत्तम आरोग्य,
समृद्धी आणि यशाने भरले जावो
हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना
गणेश चतुर्थीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
…
सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!
…
हार फुलांचा घेऊनी वाहू चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे,
पुजन करुया गणरायाचे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
…
सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम
गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
…
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
…
तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.