Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला कसे पडले गजानन आणि एकदंत हे नाव? जाणून घ्या या संबंधी रंजक कथा-ganesh chaturthi 2024 why ganpati bappa is called ekdant and gajanan read katha ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला कसे पडले गजानन आणि एकदंत हे नाव? जाणून घ्या या संबंधी रंजक कथा

Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला कसे पडले गजानन आणि एकदंत हे नाव? जाणून घ्या या संबंधी रंजक कथा

Sep 07, 2024 07:46 PM IST

Ganpati Festival 2024 : शनिवार ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थीचा पवित्र सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणपतीला एकदंत, गजानन या नावांनीही ओळखले जाते. श्री गणेशाला एकदंत आणि गजानन या नावांनी का ओळखले जाते ते जाणून घेऊया.

गणपती बाप्पाची कथा
गणपती बाप्पाची कथा

आज शनिवार ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थीचा पवित्र सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. १० दिवस चालणाऱ्या गणेश महोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थीपासून १० दिवस विधीनुसार श्रीगणेशाची आराधना केल्यास अपेक्षित फळ मिळते. श्रीगणेश आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. देशभरात गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत सुरू आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाचा हा जल्लोष ठिकठिकाणी पाहायला मिळतो आहे. 

गणपती बाप्पाला अनेक नावांनी ओळखले जाते. गणपती बाप्पाच्या अनेक कथाही प्रचलित आहेत. गणपतीला एकदंत, गजानन या नावांनीही ओळखले जाते. श्री गणेशाला एकदंत आणि गजानन या नावांनी का ओळखले जाते ते जाणून घेऊया…

भगवान श्री गणेशाला गजानन नाव कसे पडले-

पौराणिक कथेनुसार, एकदा नंदीने माता पार्वतीच्या कोणत्याही आदेशाचे पालन केले नाही. त्यानंतर पार्वती माताने विचार केला की कोणीतरी असावं जो फक्त तिच्या आदेशाचे पालन करेल. मग माता पार्वतीने आपल्या मळापासून एका गणाला जन्म दिला आणि त्यात प्राण फुंकला आणि गणेशाचा जन्म झाला. यानंतर माता पार्वती आंघोळीसाठी गेली आणि मुलाला बाहेर पहारा ठेवण्यास सांगितले. माता पार्वतीने मुलाला आज्ञा केली होती की, तिच्या परवानगीशिवाय कोणालाही आत येऊ देऊ नये. जेव्हा भगवान शिव स्वत: तिथे आले तेव्हा मुलाने त्यांना आत जाण्यापासून रोखले. जेव्हा मुलाने त्यांना आत जाऊ दिले नाही तेव्हा भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशुळाने मुलाचा शिरच्छेद केला. हे सर्व पाहून माता पार्वतीला राग आला आणि तिने आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. त्यानंतर भगवान शिवाने हत्तीचे डोके मुलाच्या धडाशी जोडले. तेव्हापासून गणेशाला गजानन म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

परशुरामने गणपती बाप्पाचा एक दात तोडला होता

भगवान शंकर आणि माता पार्वती त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होते. कोणालाही येऊ देऊ नका असे सांगितले. तेव्हा परशुरामजी भगवान शंकरांना भेटायला आले. पण गणेशाने भगवान शंकरांना भेटण्यास नकार दिला. हे पाहून परशुराम संतापले आणि त्यांनी गजाननाला लढण्याचे आव्हान दिले. अशा प्रकारे गणाध्यक्ष गणेशाला त्यांच्याशी युद्ध करावे लागले. गणेश आणि परशुराम यांच्यात घनघोर युद्ध झाले. गणेश परशुरामाचा प्रत्येक हल्ला निष्फळ करत राहिला. शेवटी क्रोधाने भरलेल्या परशुरामाने शिवाकडून मिळालेल्या परशुने गणेशावर प्रहार केला आणि गजाननाचा एक दात तुटला. तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हटले जाऊ लागले.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. जो केवळ सामान्य जनहित लक्षात घेऊन मांडण्यात आला आहे.

Whats_app_banner