Vastu Tips For Ganpati Bappa Idol : गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून सलग १० दिवस गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या काळात घरच्या मंदिरात किंवा घरी सजावट करून पूजा मंडपात गणपतीची मूर्ती बसवली जाते आणि विधीनुसार त्याची पूजा केली जाते. पंचांगानुसार यंदा ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. त्याच वेळी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी १७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश विसर्जनाने गणेश उत्सवाची सांगता होईल.
गणेश चतुर्थी निमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात या उत्सवाचे विशेष वैभव दिसून येते. महाराष्ट्रासह आता परदेशातही गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष दिसून येतो. गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त मंदिरे आणि मंडपांची विशेष सजावट केली जाते. गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी आपण जातो तेव्हा आकर्षक अशा गणेश मूर्तीची निवड करतो. अनेक जण त्यांना हवी तशी मूर्ती बनवण्याची ऑर्डर खूप आधीच देऊन ठेवतात.
वास्तूनुसार गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. वास्तु तज्ञाकडून गणेशाच्या मूर्तीशी संबंधित वास्तू टिप्स जाणून घेऊया:
वास्तु तज्ज्ञांच्या मते, हिरव्या रंगाची गणेशमूर्ती उत्तर दिशेला बसवल्यास आर्थिक संबंधित समस्या दूर होतात.
काळ्या रंगाची गणेश मूर्ती उत्तर-पूर्व दिशेला ठेवावी. वास्तुनुसार असे केल्याने मानसिक तणाव आणि रोग तसेच, दोषांपासून आराम मिळतो.
केशरी रंगाचा गणपती बाप्पा दक्षिण किंवा आग्नेय दिशेला ठेवा. असे मानले जाते की यामुळे आत्मविश्वास वाढतो.
जीवनात सुख, शांती आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळावा यासाठी पांढऱ्या रंगाची गणेशमूर्ती घरी आणू शकता. या रंगाचा गणपती उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावा.
वास्तू तज्ज्ञांच्या मते वास्तू दोष दूर करण्यासाठी घरातील मंदिर, स्वयंपाकघर आणि कार्यालयात गणेशाची मूर्ती स्थापित करणे शुभ असते.
वास्तूनुसार घरामध्ये गणपतीच्या खूप जास्त मूर्ती एकत्र ठेवू नयेत.
घरामध्ये डाव्या सोंडेची गणेशाची मूर्ती स्थापित करणे फायदेशीर मानले जाते.
गणेशमूर्ती घरात ठेवण्यासाठी मूर्तीची उंची ६ इंचांपेक्षा जास्त नसावी.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)