गणेश स्थापना, इतर पूजा-विधी, गृहप्रवेश, घटस्थापना यांसारख्या धार्मिक कार्यात नारळाचे विशेष महत्त्व आहे. या शुभ प्रसंगी कलशाची स्थापना केली जाते आणि कलशाच्या वरती नारळ नक्कीच ठेवला जातो. प्रत्येक मंदिरावरही कळस असतो. अनेकजण आपल्या घरच्या देवघरातही कलश स्थापन करून ठेवतात. कलश पूजनामुळे सुख व समृद्धि वाढण्यास मदत होते. तसेच कलशात टाकण्यात येणाऱ्या वस्तु यास अधिक पवित्र बनवत असतात.
कलशाची स्थापना हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. कोणत्याही पूजेत, शुभ आणि मंगल कार्याच्या सुरुवातीला कलशाची स्थापना केली जाते. धार्मिक शास्त्रांमध्ये कळस सुख, समृद्धी आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. पण नारळाशिवाय कलशाची स्थापना अपूर्ण आहे.
नारळ हे गणेशाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार नारळात त्रिदेवांचाही वास असतो. कलशावर नारळ ठेवल्याने शुभ कार्यात त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कार्ये विना अडथळा पूर्ण होतात. नारळ लाल कपड्यात गुंडाळून कच्चा कापूस किंवा कलव्याने बांधून कलशाच्या वर ठेवणंही शुभ असतं.
देवघरात कलश ठेवतो आपण तो कलश कुलदेवतेचा नावाचा असतो. तो कलश कोणत्याही मंगळवारी ठेवायचा असतो. त्या कलश मधील पाण्यामध्ये हळद, कुंकू, सुपारी, तांदूळ,१ फुल, आणि १ रुपया टाकायचे असते आणि हा कलश आपल्या डाव्या बाजूला आणि देवाच्या उजव्या बाजूला देवघरात ठेवायचा असतो..आणि त्यातील पाणी रोज बदलायचे नाही तर मंगळवारी बदलायचे असते जर मंगळवारी नाही जमले बदलायला तर शुक्रवारी बदलायचे असते आणि ते पाणी तुळशीला किंवा कोणत्या ही झाडाला घालू शकता.
अधोमुखं शत्रु विवर्धनाय, ऊर्धवस्य वस्त्रं बहुरोग वृध्यै। प्राचीमुखं वित विनाशनाय, तस्तमात् शुभं संमुख्यं नारीलेलंष्।” या श्लोकात कलशात नारळ कसा ठेवावा, हे सांगितले आहे.
कलशावर नारळ ठेवताना शेंडीचा भाग वर करावा. म्हणजेच नारळ ठेवताना लक्षात ठेवा की, नारळाचे मुख पूजा करणाऱ्या व्यक्तीकडे असावे. नारळाला पाणी लागेल इतके पाणी कलशात घालावे. तसेच कलशात दूध पाणी घालावे.! एक नाणे टाकावे. नारळाच्या कडेने आंब्याची वा विड्याची पाने लावावीत. नारळावरही हळद कुंकू वहावे. कलशावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढावे. कलश ठेवण्यापूर्वी खाली तांदूळ वा गहू पसरुन त्यावर हळदकुंकू टाकावे. कलशावर नारळ ठेवून विधीपूर्वक व योग्य नियमाने व कलशाची स्थापना केल्यानेच पूजा यशस्वी होते.