Ganesh Chaturthi 2024 Date : गणेश चतुर्थी हा सण गणेशाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. शास्त्रानुसार भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला झाला होता. गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा हा उत्सव अनंत चतुर्दशीला संपतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात बाप्पाला घरी आणतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचे विसर्जन करतात. २०२४ मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे आणि येत्या पाच वर्षांच्या तारखा जाणून घ्या-
पार्थिव गणेश पूजन करून दहा दिवस आपण गणेश पूजन मोठ्या भक्तिभावाने करतो. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण+पती = गणपती देवाचा जन्म झाला होता. त्यामुळे गणेश पूजन केले जाते.
वर्ष २०२४ मध्ये गणेश चतुर्थी केव्हा आहे -
वर्ष २०२४ मधील चतुर्थी तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून १ मिनिटांनी सुरू होईल आणि ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी समाप्त होईल. उदया तिथी वैध असल्यामुळे, गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर २०२४ रोजी, शनिवारी साजरी केली जाईल.
वर्ष २०२४ मध्ये गणेश चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त -
वर्ष २०२४ मध्ये गणेश स्थापना आणि पूजा शुभ वेळ सकाळी ११ वाजून ३ मिनिटे ते दुपारी १ वाजून ३४ मिनिटापर्यंत असेल. पूजेचा एकूण कालावधी २ तास ३१ मिनिटे आहे.
आपण किती दिवस सण साजरा करू शकतो?
तुम्ही गणेश चतुर्थी १.२, ५, ७, १० किंवा ११ दिवस साजरी करू शकता. या कालावधीनंतर मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते.
२०२४ मध्ये अनंत चतुर्दशी कधी आहे-
२०२४ मध्ये, अनंत चतुर्दशी सोमवार, १६ सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लोक बाप्पाला निरोप देतात.
येत्या पाच वर्षांत गणेश चतुर्थीच्या तारखा-
वर्ष २०२५ - बुधवार, २७ ऑगस्ट
वर्ष २०२६ - सोमवार, १४ सप्टेंबर
वर्ष २०२७ - शनिवार, ४ सप्टेंबर
वर्ष २०२८ - बुधवार, २३ ऑगस्ट
वर्ष २०२९ - मंगळवार, ११ सप्टेंबर
गणेशोत्सव कधी पासून सुरू आहे
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या काळात समाजातील एकी वाढण्याकरिता या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतात गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो.