हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान गणेश आहे. गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका आराध्य देवता आहे. भाद्रपद चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. आपला लाडका बाप्पा घरी यावा आणि आपल्यासोबत राहावा यासाठी लहान-लहान मुलेही उत्सुक असतात. गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी या वर्षी सर्व सज्ज झाले आहेत आणि तशी तयारीही सुरू झाली आहे. बुद्धिदाता, विघ्नहर्ता, विनायक, गजानन, वक्रतुंड, अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो. जाणून घ्या या वर्षी गणेश स्थापना कधी होईल आणि घरी गणपती बाप्पा बसवतोय तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
गणेश चतुर्थी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून १ मिनिटांनी सुरू होईल आणि ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी संपेल. उदया तिथीच्या मान्यतेनुसार गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. या दिवशी तुम्ही गणपतीला तुमच्या घरी बसवू शकता आणि अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज मोठ्या थाटामाटात त्यांची पूजा करू शकता. मान्यतेनुसार, १, ३, ५, ७, १० आणि ११ दिवस तुमच्या परंपरेनुसार गणपतीची पूजा करून तुम्ही गणपती बाप्पाला निरोप देऊ शकता. १६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी होणार असून, या दिवशी गणेशाला निरोप दिला जाणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे.
गणपतीची मूर्ती उजवीकडे तोंड करून स्थापित करा आणि दररोज गंगाजलाने ते स्थान शुद्ध करा.
गणेशाची पूजा करताना स्वच्छता आणि शुद्धतेची विशेष काळजी घ्या.
तुमच्या घरात दोन मूर्ती असतील तर एका मुर्तीचे मुख बाहेर आणि एकाचे मुख आतून असावी.
अशा गणेशाची मूर्ती ठेवू नका, ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल, कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत.
त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी.
घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी, घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी.
यासोबतच गणपती बाप्पास कधीही पायऱ्यांखाली ठेवू नयेत.
त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यात गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये.
गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे.
जोपर्यंत श्रीगणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा भोजन द्यावे.
तसेच गणेशाची मूर्ती दारावर लावल्याने घरात सकारात्मकता येते.
गणपतीच्या मूर्ती जवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये. कारण चामडं जनावरांपासून बनला असतो. म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट, जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे.
दररोज सकाळ संध्याकाळ गणेशमूर्तीसमोर दिवा लावून पूजा करावी.