Ganesh Chaturthi : चिंचपोकळीच्या चिंतामणीचं देखणं रूप, तुम्ही दर्शन घेतलं का? डोळ्यांचं पारणं फिटेल!-ganesh chaturthi 2024 chincpokli cha chintamani darshan mumbai ganpati festival ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ganesh Chaturthi : चिंचपोकळीच्या चिंतामणीचं देखणं रूप, तुम्ही दर्शन घेतलं का? डोळ्यांचं पारणं फिटेल!

Ganesh Chaturthi : चिंचपोकळीच्या चिंतामणीचं देखणं रूप, तुम्ही दर्शन घेतलं का? डोळ्यांचं पारणं फिटेल!

Sep 04, 2024 05:00 PM IST

Chincpokli Cha Chintamani Darshan : आता गणरायाच्या आगमनाची आतुरता वाढतच चालली आहे. सर्व भक्त गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. तर मुंबई येथील अनेक गणपती बाप्पाचा आगमन सोहळाही झाला आहे. मुंबईतील लालबाग परिसरातील चिंचपोकळीचा चिंतामणीचे दर्शन घ्या आणि बाप्पाचे वैशिष्ट्य जाणून घ्या.

चिंचपोकळीचा चिंतामणी
चिंचपोकळीचा चिंतामणी

गणपती बाप्पा आणि गणेशोत्सव असे ऐकले की वेध लागतात बाप्पाच्या स्वागताचे आणि सर्वांचीच उत्साहात तयारी सुरू होते. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची जयंती देशभरात साजरी केली जाते, यालाच गणेश चतुर्थी म्हणतात. 

गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर देशभरात भव्य गणेश उत्सवाचे आयोजन केले जाते. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये १० दिवस हा उत्सव मोठ्या जल्लोषात सुरू राहतो. दरम्यान, बाप्पाच्या भव्य मूर्ती स्थापित केल्या जातात, ज्याची भव्यता महाराष्ट्रात सर्वात जास्त दिसते.

यंदा ७ सप्टेंबरपासून सुरू झालेला गणेशोत्सव १७ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, त्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अवघ्या काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला असून मुंबईतल्या अनेक मोठ्या मानाच्या गणरायांचे वाजत गाजत आगमन होत आहे. मुंबईतील सर्वात जुन्या मंडळांपैकी एक म्हणून चिंतामणी गणेशोत्सव मंडळाला ओळखले जाते. ३१ ऑगस्ट रोजी चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा लाखो गणेशभक्तांच्या उपस्थितीत, ढोल ताश्याच्या गजरात आणि गणरायाच्या जयघोषाने पार पडला. 

यावर्षी मंडळ १०५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. लालबाग परिसरातला सर्वात जुने असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच 'चिंचपोकळी चा चिंतामणी' या नावाने प्रसिद्ध असणार्‍या उत्सव मंडळाची स्थापना १९२० साली लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून करण्यात आली. 

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारात श्रद्धेने येणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच आहे. याच्या आगमन सोहळ्यालाच मुंबई तसेच मुंबईच्या बाहेरच्या शहरातील हजारो मंडळींनी खास उपस्थिती दर्शविली होती. १९६८-६९ साली सुवर्ण महोत्सव, १९७९ साली-८० साली हिरक महोत्सव तर १९९४-९५ साली ७५ वे वर्षे साजरे करण्यात आले. चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो.

चिंचपोकळीच्या चिंचामणीचे वैशिष्ट्य

चिंचपोकळीच्या चिंतामणी’ची देखणी मूर्ती पाहायला मिळत आहे. बाप्पाची मूर्ती सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारी आहे. चिंतामणीच्या मुर्तीची उंची १८ फूट असून यंदा चिंतामणी श्रीकृष्ण अवतारात विराजमान झाला आहे. बाप्पाला चिंतामणी रंगाचे धोतर नेसवलेले असून, त्यावर निळ्या रंगाचा शेला, बाप्पाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट, सोन्या-चांदीचे दागिनेही परिधान केलेले दिसत आहेत. यंदाची 'चिंतामणी'ची प्रभावळ श्रीकृष्ण अवतार जगन्नाथ आणि सोबत सुभद्रा तसेच बलराम अशी संकल्पना साकारली आहे. तरूणाईचं खास आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणी चे रुप आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लाखो भाविकांनी आगमन सोहळ्यालाच उपस्थिती लावली.

विभाग