आज रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जात आहे. यंदा श्री संत गजानन महाराज यांचा १४६ वा प्रकट दिन आहे. जाणून घ्या गजानन महाराजांविषयी थोडक्यात.
गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले. अन्न हे पूर्ण ब्रह्म दाखवीत शेगांव ग्रामी माध्यांन्य वेळी प्रगट झाले , भक्तांना वेळोवेळी साथ मार्ग दाखवत भक्तांना विठ्ठल दर्शन घडविले. शेगावनिवासी श्री संत गजानन महाराजांना श्री दत्तगुरुंचे तिसरे रूप म्हणूनही ओळखले जाते. सद्गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्गुरू होते.
श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जातात.
अनेक ठिकाणी 'गण गण गणात बोते’ नामाचा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात प्रकट दिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात लाखो भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
श्री संत गजानन महाराज परमज्ञानी, अध्यात्मिक, महान योगी, भक्तवत्सल होते. पालखी माध्यमातून गजानन महाराज अगदी खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचले.
विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे संजीवन समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दुःखसागरात बुडाले.
कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा
॥ गण गण गणांत बोते ॥
…
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा…
गण गण गणात बोते !
॥॥ जय गजानन श्री गजानन ॥॥
…
जय जय सदगुरु गजानन |
रक्षक तूंचि भक्तजनां |
निर्गुण तूं परमात्मा तू |
सगुण रूपात गजानन तू |
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…
…
"मी गेलो ऐसे मानू नका। भक्तित अंतर करू नका।
कदा मजलागी विसरु नका। मी आहे येथेच॥"
"दु:ख न करावे यत्किंचित। आम्ही आहोत येथेच।
तुम्हा सांभाळण्यापरी सत्य। तुमचा विसर पडणे नसे॥."
गजानन महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा