मराठी बातम्या  /  धर्म  /  Shukravarche Upay : आज संध्याकाळ होताच करा 'हे' उपाय, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

Shukravarche Upay : आज संध्याकाळ होताच करा 'हे' उपाय, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Aug 04, 2023 11:29 AM IST

Shukravarche Upay : आज शुक्रवारचा दिवस आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. शुक्रवारी देवी लक्ष्मीचं आवाहन केल्यास ती तुम्हाला धनधान्याचा आशिर्वाद तर देतेच, पण त्या सोबतच शांतीही प्रदान करते.

माता लक्ष्मी
माता लक्ष्मी (wordzz)

प्रत्येक दिवस हा हिंदू धर्मात कोणत्यातरी देवतेला समर्पित दिवस आहे. त्यामुळेच आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाचं नाव घेतो, घरात दिवा आणि उदबत्ता लावतो आणि आलेला दिवस सुखाने पार पडू दे अशी देवाला विनंती करतो.

ट्रेंडिंग न्यूज

आज शुक्रवारचा दिवस आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. शुक्रवारी देवी लक्ष्मीचं आवाहन केल्यास ती तुम्हाला धनधान्याचा आशिर्वाद तर देतेच, पण त्या सोबतच शांतीही प्रदान करते. त्यामुळेच शुक्रवारी सूर्यास्त होताच देवी लक्ष्मीसाठी काही गोष्टी केल्यास तुमच्या घरातली सुबत्ता टिकून राहील असं सांगितलं जातं.

शुक्रवारी देवा लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय कोणते?

शुक्रवारी सूर्यास्त होताच घराच्या मुख्य दारावर तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि आर्थिक स्थितीही मजबूत होते.

आज, शुक्रवारी सूर्यास्त होताच सात वातींचा दिवा लावा आणि ईशान्य कोपऱ्यात ठेवा. तसेच या दिव्यात चिमूटभर केशर घाला. शुक्रवारी हा उपाय केल्याने धन आणि संपत्तीमधील सर्व अडथळे दूर होतात.

या दिवशी कोणतीही गोष्ट उधार देणे व घेणे टाळावे. विशेषत: सूर्यास्तानंतर कोणालाही उधार देऊ नका आणि उधार घेऊ नका. असे केल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊन कर्जाचा बोजा वाढू लागतो. सूर्यास्तानंतर काही हवे असल्यास पैसे देऊनच खरेदी करा.

या दिवशी संध्याकाळी कुटुंबासह माता लक्ष्मीची आरती करा आणि माता लक्ष्मीला पांढरी मिठाई किंवा खीर अर्पण करा. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते.

सूर्यास्तानंतर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार होणार नाही याची विशेष काळजी घ्या. सूर्यास्त होताच घराचा मुख्य दरवाजा, पूजेची खोली, स्वयंपाकघर आणि अंगणात दिवे लावावेत. तसे न केल्यास घरात गरिबी येते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग