उत्तर प्रदेशातील प्रयागगराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात देशभरातील कोट्यवधी यात्रेकरू सहभागी झाले आहेत. २६ फेब्रुवारीपर्यंत हा कुंभमेळा चालणार आहे. दरम्यान, कुंभमेळ्यात विविध स्वयंसेवी संस्थांसोबतच अनेक उद्योगसमूहांनी देखील यात्रेकरूंच्या मदतीसाठी हात पुढे केले आहे. देशातली बलाढ्य कंपनी असलेल्या रिलायन्सतर्फे कुंभमेळ्यात यात्रेकरूंसाठी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. रिलायन्स उद्योगसमूहातर्फे प्रयागराजमध्ये ‘तीर्थ यात्री सेवा’ नावाचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याद्वारे कुंभमेळ्यातील यात्रेकरूंसाठी पौष्टिक आहार, अत्यावश्यक आरोग्यसेवा, सुरक्षित वाहतूक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी सारख्या सेवा पुरवल्या जात आहे.
कुभमेळ्यात ‘तीर्थ यात्री सेवा’ प्रकल्प राबवण्यासाठी रिलायन्स कंपनीतर्फे हजारो स्वयंसेवकांची टीम प्रयागराज येथील संगमावर काम करत आहे. याअंतर्गत रिलायन्सचे स्वयंसेवक कुंभमेळ्यातील विविध आखाड्यात जाऊन हजारो यात्रेकरूंना दररोज मोफत जेवण आणि पाण्याचे वाटप करतात. यात्रेकरूंच्या आरोग्य सुविधेसाठी रिलायन्स फाउंडेशनतर्फे फिरते दवाखाने स्थापित करण्यात आले आहे. यात पुरुष आणि महिलांसाठी वेगळे वॉर्ड, ओपीडी सुविधा तसेच दंतचिकित्सा सुविधा पुरविण्यात येत आहे. या सुविधा दिवसरात्र सुरू असतात. कुंभमेळ्यात रिलायन्सतर्फे महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिनचेही वाटप करण्यात येत आहे. याशिवाय
प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याच्या ठिकाणी मोबाइलधारकांना चांगले नेटवर्क उपलब्ध व्हावे यासाठी रिलायन्स जिओकडून 4G आणि 5G चे नवीन बेस ट्रान्सिव्हर स्टेशन स्थापित करून नेटवर्कसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणार करण्यात आली आहे. रिलायन्स जिओतर्फे मोक्याच्या ठिकाणी टॉवर आणि छोटे सेल बसवण्यात आले आहे. अखंड मोबाइलसेवेसाठी महत्वाच्या ठिकाणी नवीन ऑप्टिकल फायबर बसवण्यात आले आहे. कुंभमेळ्यात जास्तीत जास्त यात्रेकरूंपर्यंत या सुविधा पोहोचण्यासाठी रिलायन्सतर्फे शारदा पीठ मठ ट्रस्ट द्वारका, श्री शंकराचार्य उत्सव सेवालय फाउंडेशन, निरंजनी आखाडा, प्रभू प्रेमी संघ चॅरिटेबल ट्रस्ट आणि परमार्थ निकेतन आश्रम या संस्थांसोबत सहयोग करत आहे.
संबंधित बातम्या