भारतीय समाजात वास्तू शास्त्राला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्राचा उगम भारतात झाला आणि आज जगभरातील लोक वास्तूच्या नियमांचे पालन करून घरे बांधत आहेत. जर तुमच्या घराची वास्तू बरोबर असेल तर तुमच्या जीवनात सकारात्मकता येते तर चुकीच्या वास्तूमुळे आयुष्यात अडचणी येऊ शकतात.
अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या घरात वास्तुदोष असल्यास तुम्हाला कोणत्या प्रकारचे संकेत मिळतात.
जर तुमच्या घरात लावलेली झाडे सुकत असतील आणि खत आणि पाणी देऊनही वाढू शकत नसतील तर याचा अर्थ तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो. वास्तुदोषांमुळे झाडांची कितीही काळजी घेतली तरी त्यांची भरभराट होत नाही.
जर तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत आजारी पडत असेल आणि आजारांमुळे तुमचे पैसे खर्च होत असतील तर समजा तुमच्या घरात वास्तुदोष आहे. यासोबतच वास्तुदोषामुळे तुम्हाला डोकेदुखी, सांधे किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
खूप मेहनत करूनही तुम्हाला सतत अपयश येत असेल तर समजून जा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे. वास्तू दोषामुळे तुमचे प्रमोशन थांबू शकते, तुमचे उत्पन्न वाढू शकत नाही आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणीही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तुमच्यासोबत अचानक एखादी दुर्घटना घडली किंवा तुम्हाला सातत्याने वाईट बातम्या ऐकायला मिळत असतील, तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते आणि तुमच्यासोबतच तुमच्या कुटुंबातील सदस्यांवरही अप्रिय घटना घडू शकतात.
जर तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की टीव्ही, फ्रीज, मोबाईल इत्यादी वारंवार खराब होत असतील तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण आहे. या गोष्टी खराब झाल्यामुळे तुमचा खर्च वाढतो आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होतात.
जर तुम्हाला वास्तुदोषांमुळे तुमच्या जीवनात समस्या येत आहेत असे वाटत असेल तर तुम्ही काही उपाय करून पाहा:-
१) तुम्ही पाण्यात मीठ मिसळा आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा संपूर्ण घर पुसून टाका, यामुळे वास्तू दोषांचे वाईट परिणाम कमी होतात.
२) जर तुम्ही घराचा उंबरठा थोडा उंच केला तर यामुळे वास्तुदोषही दूर होऊ शकतात.
३) घराच्या मुख्य दरवाजावर श्रीगणेशाची मूर्ती ठेवल्यानेही वास्तुदोषांपासून मुक्ती मिळू शकते.
४) मुख्य दरवाजासमोर निसर्गाचे सौंदर्य दर्शवणारा फोटो लावावा, जेणेकरून घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो फोटो आधी दिसेल, असे केल्याने वास्तुदोषांचा प्रभावही कमी होतो.
५) यासोबतच घरात मोराची पिसे आणि तुळशीचे रोप लावून वास्तु दोष कमी करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)