चैत्र नवरात्री, गुढी पाडवा ते हनुमान जयंती... एप्रिल महिन्यातील प्रमुख सण कधी? तारखा जाणून घ्या-festivals of the month of april 2024 chaitra month gudi padhva to ram navami april month festivals list calendar 2024 ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  चैत्र नवरात्री, गुढी पाडवा ते हनुमान जयंती... एप्रिल महिन्यातील प्रमुख सण कधी? तारखा जाणून घ्या

चैत्र नवरात्री, गुढी पाडवा ते हनुमान जयंती... एप्रिल महिन्यातील प्रमुख सण कधी? तारखा जाणून घ्या

Apr 01, 2024 04:59 PM IST

April Festivals 2024 List : एप्रिल महिना खूप खास मानला जातो. कारण हिंदू नववर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यातूनच होते. यासोबतच या महिन्यात अनेक मोठे ग्रहही आपले राशी परिवर्तन करणार आहेत.

April Festivals 2024 List : चैत्र नवरात्री, गुढी पाडवा ते हनुमान जयंती... एप्रिल महिन्यातील प्रमुख सण कधी? तारखा जाणून घ्या
April Festivals 2024 List : चैत्र नवरात्री, गुढी पाडवा ते हनुमान जयंती... एप्रिल महिन्यातील प्रमुख सण कधी? तारखा जाणून घ्या

April Festivals 2024 List : हिंदू धर्मात सर्व उपवास आणि सण पंचांग तिथीनुसार साजरे केले जातात. तसेच, सण हा असा काळ असतो, जिथे लोक त्यांच्या सर्व समस्या आणि अडचणी विसरून आपल्या प्रियजनांसोबत आनंद साजरा करण्यात व्यस्त असतात. यामुळेच लोकांमध्ये सणांबाबत विशेष उत्साह असतो.

दरम्यान, एप्रिल महिना खूप खास मानला जातो. कारण हिंदू नववर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यातूनच होते. यासोबतच या महिन्यात अनेक मोठे ग्रहही आपले राशी परिवर्तन करणार आहेत.

यासोबतच वर्षातील पहिले सूर्यग्रहणही एप्रिल महिन्यातच होणार आहे. पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

पंचांगानुसार, चैत्र हा हिंदू महिनादेखील एप्रिल महिन्यात सुरू आहे. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्यात अनेक प्रमुख सण आणि व्रत साजरे केले जातात, त्यापैकी चैत्र नवरात्री आणि रामनवमी हे देखील एक आहेत. 

यासोबतच एप्रिल महिन्यात पापमोचनी एकादशी व्रत आणि कामदा एकादशी व्रत देखील पाळले जाणार असून याला विशेष महत्त्व आहे. यासोबतच हिंदू नववर्षाचीही सुरुवात एप्रिल महिन्यात होत आहे. त्याचबरोबर वर्षातील पहिले सूर्यग्रहणही याच महिन्यात होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिना विशेष मानला जातो.

एप्रिल सण २०२४ मधील सण-उत्सव

१ एप्रिल, सोमवार - शितला सप्तमी, कालाष्टमी

२ एप्रिल, मंगळवार – शितला अष्टमी (बसोदा)

३ एप्रिल, शुक्रवार - पापमोचनी एकादशी

६ एप्रिल, शनिवार - शनि त्रयोदशी, प्रदोष व्रत

७ एप्रिल, रविवार - मासिक शिवरात्री

९ एप्रिल, मंगळवार - चैत्र नवरात्री, घटस्थापना, गुढी पाडवा

११ एप्रिल, गुरुवार – मत्स्य जयंती, गौरी पूजा

१२ एप्रिल, शुक्रवार – लक्ष्मी पंचमी, विनायक चतुर्थी

१४ एप्रिल, रविवार - यमुना छठ

१६ एप्रिल, मंगळवार – मासिक दुर्गाष्टमी

१७ एप्रिल, बुधवार - राम नवमी

१९ एप्रिल, शुक्रवार – कामदा एकादशी

२० एप्रिल, शनिवार - वामन द्वादशी

२३ एप्रिल, मंगळवार - हनुमान जन्मोत्सव, चैत्र पौर्णिमा व्रत

२७ एप्रिल, शनिवार – विकट संकष्टी चतुर्थी व्रत

विभाग