हिंदू धर्मात रुढी, परंपरा, चालिरिती, सण-उत्सव यांमध्ये वैविध्य आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही व्रत-वैकल्य, पूजा-पाठ, सण-उत्सव सुरुच असतात. निसर्गाप्रमाणेच आपल्याकडे महिने, ऋतू, सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. भारतातील बरेचसे सण, उत्सव मेळे आणि जत्रा या मौसमी स्वरूपाच्या असतात. त्या साजरा करण्याचा दिनांक भारतीय पंचांगाला अनुसरून असतात. या सणांचे अंकनही मराठी कॅलेंडरवर असते.
येत्या तीन दिवसांनी सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. हिंदू धर्मात दर महिन्याला अनेक उपवास आणि सण आहेत. ज्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि जन्माष्टमीसह अनेक सण साजरे केले गेले आहे, त्याचप्रमाणे सप्टेंबर महिना देखील व्रत-वैकल्य आणि सणांच्या बाबतीत खूप खास असणार आहे. या महिन्यात पोळा, सोमवती अमावस्या, हरतालिका, राधाअष्टमी व्रत, प्रदोष व्रत, परिवर्तनिनी एकादशी व्रत, गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, श्राद्ध पक्षासह अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण साजरे केले जातील. सप्टेंबर महिन्यात गणपती बाप्पाच्या स्वागतासह इतर कोणते व्रत-वैकल आहे जाणून घ्या सर्व सण-उत्सवाची यादी.
रविवार १ सप्टेंबर - मासिक शिवरात्री
सोमवार २ सप्टेंबर - दर्श-पिठोरी अमावस्या, सोमवती अमावस्या, पोळा, पाचवा श्रावण सोमवार
गुरुवार ५ सप्टेंबर - शिक्षक दिन, श्री चक्रधर स्वामी जयंती
शुक्रवार ६ सप्टेंबर - हरतालिका तृतीया
शनिवार ७ सप्टेंबर - श्री गणेश चतुर्थी, श्रीपाद श्रीवल्लभ जयंती
रविवार ८ सप्टेंबर - ऋषीपंचमी, श्री गजानन महाराज, मच्छिंद्रनाथ जयंती
मंगळवार १० सप्टेंबर - गौरी आवाहन
बुधवार ११ सप्टेंबर - गौरी पूजन, दुर्गाष्टमी
गुरुवार १२ सप्टेंबर - गौरी विसर्जन
शनिवार १४ सप्टेंबर - परिवर्तिनी एकादशी
रविवार १५ सप्टेंबर - प्रदोष, वामन जयंती
सोमवार १६ सप्टेंबर - अनंत चतुर्दशी, ईद-ई-मिलाद
मंगळवार १७ सप्टेंबर - प्रोष्ठपदी पौर्णिमा, गणेश विसर्जन
बुधवार १८ सप्टेंबर - महालयारंभ (पितृ पक्षाची सुरुवात), चंद्रग्रहण, भाद्रपद पौर्णिमा
शनिवार २१ सप्टेंबर - संकष्ट चतुर्थी
मंगळवार २४ सप्टेंबर - कालाष्टमी
शनिवार २८ सप्टेंबर - इंदिरा एकादशी
सोमवार ३० सप्टेंबर - सोमप्रदोष, त्रयोदशी श्राद्ध, मासिक शिवरात्री
४ सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करेल.
१६ सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल.
१८ सप्टेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल.
२३ सप्टेंबर रोजी बुध कन्या राशीत असेल.