प्रत्येक महिन्यात काही ना काही व्रत-वैकल्य, पूजा-पाठ, सण-उत्सव सुरुच असतात. आपल्या हिंदू धर्मात रुढी, परंपरा, चालिरिती, सण-उत्सव यांमध्ये वैविध्य आहे. निसर्गाप्रमाणेच आपल्याकडे महिने, ऋतू, सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे.
येत्या दोन दिवसांनी ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिना देखील व्रत-वैकल्य आणि सणांच्या बाबतीत खूप खास असणार आहे. या महिन्यात नवरात्रासह अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण साजरे केले जातील. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सवासह इतर कोणते व्रत-वैकल आहे जाणून घ्या सर्व सण-उत्सवाची यादी.
बुधवार २ ऑक्टोबर - सर्वपित्री अमावस्या, महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती
गुरुवार ३ ऑक्टोबर - घटस्थापना, नवरात्रारंभ
गुरुवार १० ऑक्टोबर - सरस्वती पूजन, महालक्ष्मी पूजन(घागरी फुंकणे)
शुक्रवार ११ ऑक्टोबर - दुर्गाष्टमी, महाष्टमी
शनिवार १२ ऑक्टोबर - गायत्री माता उत्सव, विजयादशमी
रविवार १३ ऑक्टोबर - पाशांकुशा एकादशी (स्मार्त)
सोमवार १४ ऑक्टोबर - भागवत एकादशी
बुधवार १६ ऑक्टोबर - कोजागरी पौर्णिमा
रविवार २० ऑक्टोबर - संकष्ट चतुर्थी, करवा चौथ (करक चतुर्थी)
गुरुवार २४ ऑक्टोबर - कराष्टमी, कालाष्टमी, गुरुपुष्यामृत योग संपूर्ण दिवस
सोमवार २८ ऑक्टोबर - रमा एकादशी, वसुबारस
मंगळवार २९ ऑक्टोबर - भौमप्रदोष, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन
बुधवार ३० ऑक्टोबर - शिवरात्री
गुरुवार ३१ ऑक्टोबर - नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, सरदार वल्लभभाई पटेल जयंती
१० ऑक्टोबर रोजी बुध तूळ राशीत प्रवेश करेल.
१२ ऑक्टोबर रोजी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
१७ ऑक्टोबर रोजी सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल.
२० ऑक्टोबर रोजी मंगळ कर्क राशीत असेल.
२९ ऑक्टोबर रोजी बुध वृश्चिक राशीत असेल.
३ ऑक्टोबर २०२४ - शैलपुत्री देवीची पूजा
४ ऑक्टोबर २०२४ - ब्रह्मचारिणी देवीची पूजा
५ ऑक्टोबर २०२४ - चंद्रघंटा देवीची पूजा
६ ऑक्टोबर २०२४ - कूष्मांडा देवीची पूजा
७ ऑक्टोबर २०२४ - स्कंदमाता देवीची पूजा
८ ऑक्टोबर २०२४ - कात्यायनी देवीची पूजा
९ ऑक्टोबर २०२४ - कालरात्रि देवीची पूजा
१० ऑक्टोबर २०२४ - महागौरी देवीची पूजा
११ ऑक्टोबर २०२४ - सिद्धिदात्री देवीची पूजा
१२ ऑक्टोबर २०२४ - विजयादशमी (दसरा)