Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व
मराठी बातम्या  /  धर्म  /  Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

May 02, 2024 10:51 PM IST

San Utsav May 2024 : मे हा सण-उत्सवाचा महिना आहे. अक्षय्य तृतीया, बुद्ध पौर्णिमा, जयंती, प्रदोष, एकादशी अशा मे महिन्यात अनेक शुभ तारखा आहेत. मे महिन्यातील व्रत-वैकल्यांचे स्वागत करण्यासाठी जाणून घ्या सर्व सण-उत्सवाची यादी.

सण-उत्सव मे २०२४
सण-उत्सव मे २०२४

प्रत्येक धर्माच्या संस्कृती, परंपरा, चालिरिती, सण-उत्सव यांमध्ये वैविध्य आहे. अनेक धर्मीय भारतात असल्यामुळे प्रत्येक इंग्रजी महिन्यात काही ना काही सण-उत्सव सुरुच असतात. मराठी नववर्षाचा पहिला महिना म्हणजेच चैत्र संपून वैशाख महिन्याला ९ मे पासून सुरुवात होत आहे. मराठी नववर्षातील बारा महिने आणि सहा ऋतू हे निसर्गचक्राप्रमाणे चालताना आपल्याला दिसतात.

निसर्गाप्रमाणेच आपल्याकडे महिने, ऋतू, सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. मे हा सण-उत्सवाचा महिना आहे. अक्षय्य तृतीया, बुद्ध पौर्णिमा, जयंती, प्रदोष, एकादशी अशा मे महिन्यात अनेक शुभ तारखा आहेत. मे महिन्यातील व्रत-वैकल्यांचे स्वागत करण्यासाठी जाणून घ्या सर्व सण-उत्सवाची यादी.

सण-उत्सवाची यादी

शनिवार ४ मे - वरुथिनी एकादशी, वल्लभाचार्य जयंती

रविवार ५ मे - प्रदोष सोमवार २० मे सोमप्रदोष

सोमवार ६ मे - मासिक शिवरात्री, श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी, संत गोरोबाकाका पुण्यतिथी

मंगळवार ७ मे - दर्श अमावस्या

बुधवार ८ मे - रवींद्रनाथ टागोर जयंती

गुरुवार ९ मे - वैशाख मासारंभ, महाराणा प्रताप जयंती(तारखेप्रमाणेल), वज्रेश्वरी पालखी

शुक्रवार १० मे - अक्षय्य तृतीया, श्री परशुराम जयंती

शनिवार ११ मे - विनायक चतुर्थी, श्री रामानुजाचार्य जयंती

मंगळवार १४ मे - गंगा सप्तमी, गंगापूजन, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती(तारखेप्रमाणे)

बुधवार १५ मे - दुर्गाष्टमी,बुधाष्टमी, अगस्ती लोप

गुरुवार १६ मे - सीता नवमी

रविवार १९ मे - मोहिनी एकादशी

मंगळवार २१ मे - श्री नृसिंह जयंती

गुरुवार २३ मे - बुद्धपौर्णिमा, वैशाखस्नान समाप्ती, कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती

शुक्रवार २४ मे - नारद जयंती

रविवार २६ मे - संकष्ट चतुर्थी

मंगळवार २८ मे - स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

गुरुवार ३० मे - कालाष्टमी

शुक्रवार ३१ मे - अहिल्याबाई होळकर जयंती(तारखेप्रमाणे)

मुख्य सण-उत्सवाचे महत्व

अक्षय्य तृतीया

शुक्रवार, १० मे २०२४ रोजी वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीतयेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला विष्णू देव आणि लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी करण्यात आलेले सत्कर्म आणि आचरण अक्षय्य असते, असे मानले जाते. या दिवशी नर-नारायण आणि हयग्रीव आदी अवतार याच दिवशी घेण्यात आल्याची नोंद पुराणात सापडते. याशिवाय श्रीविष्णूंचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या परशुरामांची जयंती आहे.

गंगासप्तमी

वैशाख शुक्ल सप्तमीच्या शुभ दिवशी गंगापूजन केले जाते, मंगळवार १४ मे रोजी गंगासप्तमी साजरी केली जाईल. गंगा जयंतीच्या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान केल्यास सात्त्विकता आणि योग्यता प्राप्त होते. वैशाख शुक्ल सप्तमीचा दिवस संपूर्ण भारतभर श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जातो.

बुद्ध पौर्णिमा

वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. म्हणूनच ही तिथी बुद्ध पौर्णिमा नावाने साजरी केली जाते. बौद्ध धर्मीय ही तिथी मोठ्या उत्साहात साजरी करतात. गुरुवार २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल.

Whats_app_banner