Feng shui tips : कर्जमुक्त व्हायचं असेल तर आजच घरी आणा यापैकी एखादी वस्तू, गरिबी पळून जाईल!
Feng shui tips on finance : फेंगशुई या चिनी वास्तुशास्त्रात सुखसमृद्धीचे व कर्जमुक्तीचे काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊया काय आहेत हे उपाय?
Feng shui tips : घरातील सुखसमृद्धीसाठी हिंदू धर्मात ज्याप्रमाणे वास्तुशास्त्राचं अनुकरण केलं जातं, तशीच पद्धत चीनमध्येही आहे. चिनी वास्तुशास्त्राला फेंगशुई असं म्हणतात. फेंगशुईच्या शास्त्रानुसार उपाय केल्यास माणूस आर्थिक संकटातून मुक्त होतो व त्याची भरभराट होते, असं मानलं जातं.
ट्रेंडिंग न्यूज
आपलं आयुष्य सुखी असावं. कुठल्याही गोष्टीची उणीव आपल्याला भासू नये असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र, अनेकदा कष्ट करूनही व्यक्तीला यश लाभत नाही. हवे तितके पैसे मिळत नाहीत. त्यामुळं मग जगण्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागतो. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अशा लोकांसाठी फेंगशुईनं समृद्धीचा मार्ग दाखवला आहे. फेंगशुईमध्ये आर्थिक समृद्धीसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. फेंगशुईशी संबंधित वस्तू घरी आणल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असं मानलं जातं.
budh gochar : बुध ग्रह धनु राशीत प्रवेश करणार; २७ नोव्हेंबरपासून 'या' राशींना सोन्याचे दिवस येणार
स्फटिक
पांढर्या रंगाचं स्फटिक ईशान्येला दिशेला ठेवावं. असं केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.
तीन पायांचा बेडूक
फेंगशुईमध्ये तीन पायांचा बेडूक अतिशय शुभ मानला जातो. हा बेडूक घरात ठेवावा, मात्र त्या बेडकाच्या तोंडात नाणी हवीत. अशा प्रकारचा बेडूक घरात आर्थिक भरभराट घेऊन येतो. घरातील गरिबी आणि दारिद्र्य पळवून लावतो.
तीन चिनी नाणी
फेंगशुईनुसार तीन चिनी नाणी घरात ठेवणं हा शुभसंकेत मानला जातो. ही नाणी लाल धाग्यात किंवा रिबिनमध्ये बांधून घरात किंवा दुकानात ठेवावीत. असं केल्यानं घरात लक्ष्मीचं आगमन होतं असं मानलं जातं.
लाफिंग बुद्धा
लाफिंग बुद्धाची मूर्ती ही आनंदाचं प्रतीक मानली जाते. फेंगशुईनुसार, लाफिंग बुद्धा घरात ठेवल्यानं आर्थिक प्रगतीसोबतच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील वातावरण आनंदी राहतं. ताणतणाव नाहीसे होतात. सुख-समृद्धी येते.
कासव
घरात किंवा कार्यालयात उत्तर दिशेला कासव ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंनी बनवलेली कासवं घरात ठेवली जातात. विशेषत: स्फटिकापासून बनवलेलं कासव दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावं. लाकडी कासव पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवावं. त्यातून अनेक चांगल्या गोष्टी साध्य होतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग