Feng Shui : घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करा 'या' गोष्टी, होईल बक्कळ पैशांची कमाई
मराठी बातम्या  /  धर्म  /  Feng Shui : घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करा 'या' गोष्टी, होईल बक्कळ पैशांची कमाई

Feng Shui : घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करा 'या' गोष्टी, होईल बक्कळ पैशांची कमाई

Nov 13, 2024 08:53 PM IST

Feng Shui Tips In Marathi : वास्तुदोषामुळे अनेकदा घरातील नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा ठेवायची असेल तर तुम्ही फेंगशुईच्या या सोप्या टिप्सच्या मदतीने घरात बदल करू शकतात.

फेंगशुई टिप्स
फेंगशुई टिप्स

फेंगशुई शास्त्रात घराच्या देखभालीसंदर्भात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुदोषांमुळे अनेकदा घरातील नकारात्मक ऊर्जा लक्षणीय रीतीने वाढते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा ठेवायची असेल तर तुम्ही फेंग शुईच्या या टिप्सच्या मदतीने घरात काही सोपे बदल करू शकतात. फेंगशुईनुसार काही उपाय केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते.

घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी फेंगशुई टिप्स

विंड चाइम- 

विंड चाइम ही एक लकी फेंगशुई आयटम आहे जी सौभाग्य आकर्षित करते आणि सकारात्मकता राखते. त्यामुळे स्टडी रूमची नकारात्मक ऊर्जाही दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे नकारात्मकता दूर करण्यासाठी विंड चाइम लावा.

जेड प्लांट- 

जर तुम्ही बराच काळ आर्थिक समस्यांशी झगडत असाल तर हे घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे देखील होऊ शकते. त्यामुळे घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि सुख-समृद्धी वाढवण्यासाठी तुम्ही जेडचे रोप लावू शकता.

लाफिंग बुद्धा

तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष, मानसिक समस्या किंवा आर्थिक समस्या असल्यास फेंगशुई शास्त्रामध्ये यासाठी उपाय सांगण्यात आले आहेत. तुम्ही लाफिंग बुद्धा घरी ठेवू शकता, यामुळे सुख-समृद्धी येते आणि जीवनातील समस्या दूर राहतात.

नाणी-

फेंगशुईमधील तीन नाणी अत्यंत शुभ मानली जातात. ही नाणी लाल कापडात गुंडाळून किंवा लाल धाग्यात बांधून घरात ठेवल्यास दारिद्र्य दूर होते आणि पैशाचा प्रवाह कायम चांगला राहतो, असे मानले जाते.

फेंगशुई घोडा-

चिनी वास्तुशास्त्र फेंगशुईनुसार घोडा हा प्रगती आणि सुख-समृद्धीचा स्वरुप मानला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवी असेल तर तुम्ही घरामध्ये घोड्याची मूर्ती ठेवू शकता.

फिश अ‍ॅक्वेरियम- 

जर तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर आपल्या घरात फिश अ‍ॅक्वेरियम ठेवा. घरात फिश अ‍ॅक्वेरियम ठेवल्याने घरातील गरिबी दूर होते.

लव्ह बर्ड्स

लव्ह बर्ड्ससारखे पक्षी प्रेमाचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे पती-पत्नीमधील सौहार्दपूर्ण संबंध टिकवून ठेवण्यासाठी बेडरूममध्ये लव्ह बर्डच्या मूर्तीची जोडी ठेवणे शुभ ठरेल.

फेंगशुई कासव - 

फेंगशुई कासव घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने समाजात व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते आणि आर्थिक समस्याही दूर होतात. हे कासव उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. फेंगशुई कासव तुमचे उत्पन्न वाढविण्यासाठी लकी ठरू शकते.

डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner