अनेक वर्षांपासून लोक आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र अशा विविध शास्त्रांचा आधार घेतात. या शास्त्रांच्या सहाय्याने लोक आर्थिक, सामाजिक, करिअर, वास्तुदोष अशा अनेक बाबींमधील अडचणींवर मार्ग शोधतात. यामध्ये आणखी एक शास्त्र आहे ज्याचा लोक मोठ्या प्रमाणात आधार घेतात. हे शास्त्र म्हणजे फेंगशुई शास्त्र होय.
फेंगशुई हे एक चिनी वास्तू शास्त्र आहे. प्राचीन काळापासून चीनमध्ये हे शास्त्र वापरून लोक आपल्या समस्येचे समाधान शोधतात. सध्या हे शास्त्र जगभरात वापरले जात आहे. अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल की, तुमच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठीसुद्धा हे शास्त्र उपयोगी ठरते. वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढविण्यासाठी फेंगशुईच्या काही खास टिप्स आपण जाणून घेणार आहोत.
फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि रोमान्स वाढविण्यासाठी प्रत्येक विवाहित जोडप्याने आपल्या खोलीत क्वार्टज ठेवणे आवश्यक आहे. हे क्वार्टज दक्षिण किंवा उत्तर दिशेतील कोपऱ्यात ठेवावे. क्वार्टज म्हणजे रंगहीन, पारदर्शक किंवा रंगीत षटकोनी क्रिस्टल्समध्ये किंवा क्रिस्टलीय वस्तुमानांमध्ये आढळणारे सिलिकॉन डायऑक्साइड असलेले खनिज होय. याला फेंगशुई शास्त्रात विशेष महत्व आहे.
फेंगशुईनुसार वैवाहिक आयुष्यात रोमान्स आणि प्रेम निर्माण करण्यासाठी बेडरूमची सजावटदेखील महत्वाची ठरते. नात्यात नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी तुमचे बेडरूम गुलाबी रंगाने रंगवा. शिवाय उशीचे कव्हर आणि पडदेसुद्धा गुलाबी रंगाचेच निवडा. अशाने नात्यात रोमान्स वाढेल. आणि गोडवा टिकून राहील.
फेंगशुई शास्त्रानुसार बेडरूममध्ये प्रचंड पसारा करून अस्वच्छता पसरवू नये. ज्या त्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात. कारण बेडरूम अस्वच्छ असेल तर त्याचा नकारात्मक प्रभाव नात्यावरदेखील पडतो. नात्यात मतभेद निर्माण होतात. त्यामुळेच नेहमी बेडरूममधील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा.
फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार, नात्यातील कडवटपणा दूर करण्यासाठी सोनेरी रंगाचे मॅडरिन डकचे जोडपे आपल्या बेडरूममध्ये ठेवावे. हे अत्यंत शुभ असते. असे केल्याने पतीपत्नीमधील मतभेद दूर होतात. नात्यात प्रेम आणि गोडवा वाढतो. शिवाय वैवाहिक आयुष्य अधिक फुलते. चिनी शास्त्रात याला प्रचंड महत्व आहे.
चिनी वास्तुशास्त्रानुसार विवाहित जोडप्याने आपल्या बेडरूममध्ये टीव्ही, लॅपटॉप, कम्प्युटर्स यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवणे टाळावे. या वस्तूंमुळे नात्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि त्यातून मतभेद, वादविवाद उद्भवतात. त्यामुळे या वस्तू शक्यतो बेडरूम ऐवजी इतर रुममध्ये ठेऊन द्याव्यात.
संबंधित बातम्या