February Festival List : फेब्रुवारी महिन्यात माघी गणेश जयंती, वसंत पंचमीसह साजरे होतील हे सण-उत्सव; वाचा संपूर्ण यादी
मराठी बातम्या  /  धर्म  /  February Festival List : फेब्रुवारी महिन्यात माघी गणेश जयंती, वसंत पंचमीसह साजरे होतील हे सण-उत्सव; वाचा संपूर्ण यादी

February Festival List : फेब्रुवारी महिन्यात माघी गणेश जयंती, वसंत पंचमीसह साजरे होतील हे सण-उत्सव; वाचा संपूर्ण यादी

Feb 02, 2025 05:07 PM IST

February 2025 Festival List In Marathi : फेब्रुवारी महिन्यात माघी गणेश जयंती आणि वसंत पंचमी अनेक मोठे व्रते आणि सण असतील. जाणून घ्या फेब्रुवारीमध्ये कोणते महत्वाचे सण-उत्सव आहेत.

फेब्रुवारी २०२५ सण-उत्सवाची यादी
फेब्रुवारी २०२५ सण-उत्सवाची यादी

February 2025 San-Utsav In Marathi : फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण पंचांगानुसार, यावेळी फेब्रुवारी महिन्यात अनेक प्रमुख उपवास आणि सण साजरे केले जातील. फेब्रुवारी महिन्यात माघी गणेश जयंती आणि वसंत पंचमीसह अनेक शुभ व्रते आणि सण असतील. 

वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्री म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाहसोहळ्याचा दिवस. फेब्रुवारी महिन्यात महाकुंभाचे तीन अमृत स्नानही होणार आहेत. इतकंच नाही तर काही ग्रहांचे गोचर होईल. जाणून घ्या फेब्रुवारी २०२५ मध्ये कोणते महत्वाचे सण-उत्सव, उपवास आहेत त्याची संपूर्ण यादी.

फेब्रुवारी महिन्यातील सण-उत्सवाची यादी -

शनिवार १ फेब्रुवारी - श्रीगणेश जयंती, विनायक चतुर्थी

रविवार २ फेब्रुवारी - वसंत पंचमी, तुकाराम महाराज जयंती

मंगळवार ४ फेब्रुवारी - रथसप्तमी

बुधवार ५ फेब्रुवारी - भीष्माष्टमी, दुर्गाष्टमी

शनिवार ८ फेब्रुवारी - जया एकादशी

रविवार ९ फेब्रुवारी - भीष्मद्वादशी

सोमवार १० फेब्रुवारी - सोमप्रदोष, श्री विश्वकर्मा जयंती

बुधवार १२ फेब्रुवारी - माघस्नान समाप्ती, माघ पौर्णिमा

गुरुवार १३ फेब्रुवारी - गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा

रविवार १६ फेब्रुवारी - संकष्ट चतुर्थी

बुधवार १९ फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)

गुरुवार २० फेब्रुवारी - कालाष्टमी, श्री गजानन महाराज प्रकट दिन

शुक्रवार २० डिसेंबर - संत गाडगेमहाराज पुण्यतिथी

शनिवार २२ फेब्रुवारी - श्री रामदास नवमी

रविवार २३ फेब्रुवारी - संत गाडगे महाराज जयंती

सोमवार २४ फेब्रुवारी - विजया एकादशी

मंगळवार २५ फेब्रुवारी - भौमप्रदोष

बुधवार २६ फेब्रुवारी - महाशिवरात्री

गुरुवार २७ फेब्रुवारी - अमावस्या

फेब्रुवारी महाकुंभ अमृत स्नान दिनांक - 

फेब्रुवारी महिन्यात महाकुंभाचे पहिले अमृत स्नान वसंत पंचमीनिमित्त ३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमेला अमृत स्नान करण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीला अखेरचे अमृत स्नान केले जाईल.

फेब्रुवारी महिन्यातील ग्रह गोचर -

मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी गुरू वृषभ राशीत मार्गी होणार आहे. काही राशीच्या लोकांवर त्याचा शुभ प्रभाव पडेल.

मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह कुंभ राशीत गोचर करेल.

बुधवार १२ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत संक्रमण करेल.

Whats_app_banner