हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वेगळे आणि धार्मिक महत्त्व आहे. माघ महिना संपताच फाल्गुन महिना सुरू होणार आहे. फाल्गुन महिना हा रविवारपासून (२५ फेब्रुवारी २०२४) सुरू होईल आणि पुढील महिन्यात सोमवारी (२५ मार्च २०२४) संपेल.
फाल्गुन महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार बारावा महिना आणि सनातन परंपरेनुसार शेवटचा महिना मानला जातो. हा महिना रंगांचा, उत्सवांचा आणि अध्यात्माचा महिना मानला जातो.
फाल्गुन महिना भगवान शिव, विष्णू, माता लक्ष्मी, श्रीकृष्ण आणि राधा राणी यांना समर्पित आहे. या महिन्यात या देवी-देवतांची उपासना केल्याने सुख-समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. फाल्गुन महिना हा उन्हाळ्याची सुरुवातही मानला जातो. हा महिना मनातील भेदभाव नाहीसा करून प्रेमाने जीवन जगण्याचे प्रतीक मानले जाते.
फाल्गुन महिन्यात महाशिवरात्री, होळी, यशोदा जयंती, विजया एकादशी यासह अनेक प्रमुख व्रत आणि सण असणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया फाल्गुन महिन्यात कोण-कोणते सण उत्सव आणि व्रत साजरे केले जाणार आहेत, त्यांची तारीख काय असेल?
२५ फेब्रुवारी २०२४, रविवार - फाल्गुन महिना सुरू होईल
२८ फेब्रुवारी २०२४ बुधवार - द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी
१ मार्च २०२४ शुक्रवार - यशोदा जयंती
३ मार्च २०२४ रविवार - भानु सप्तमी, शबरी जयंती, कालाष्टमी.
४ मार्च २०२४ सोमवार- जानकी जयंती
६ मार्च २०२४ बुधवार - विजया एकादशी
८ मार्च २०२४ शुक्रवार - महाशिवरात्री, प्रदोष व्रत
१० मार्च २०२४ रविवार - फाल्गुन अमावस्या
१२ मार्च २०२४ मंगळवार - फुलैरा दूज
१३ मार्च २०२४ बुधवार - विनायक चतुर्थी
१७ मार्च २०२४ रविवार – मासिक दुर्गाष्टमी
२० मार्च २०२४ बुधवार- अमलकी एकादशी
२१ मार्च २०२४ गुरुवार– नरसिंह द्वादशी
२२ मार्च २०२४ शनिवार - प्रदोष व्रत
२४ मार्च २०२४- छोटी होळी, होलिका दहन, फाल्गुन चौमासी चौदस.
२५ मार्च २०२४ सोमवार – होळी, लक्ष्मी जयंती, फाल्गुन पौर्णिमा
महाशिवरात्री- हिंदू धर्मातील हा सण फाल्गुन महिन्यातील सर्वात मोठा सण आहे. या वेळी महाशिवरात्रीचा उत्सव फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच शुक्रवारी (८ मार्च) रोजी साजरा केला जाईल. या दिवशी भगवान शंकराचा विवाह माता पार्वतीशी झाला होता. हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा करतात. हा उत्सव देशभर प्रसिद्ध आहे.
होळी- हिंदू धर्मात होळी या सणाला दिवाळीसारखेच महत्त्व आहे. या वेळी, हिंदू कॅलेंडरनुसार, होळी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच सोमवार (२५ मार्च) रोजी साजरी केली जाईल. हा सण रंग आणि आनंदाचे प्रतीक आहे. या दिवशी लोक एकमेकांना आपुलकीने मिठी मारून आणि एकमेकांना रंग लावून होळीचा सण साजरा करतात.
अमलकी एकादशी- फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला अमलकी एकादशी म्हणतात. यावेळी अमलकी एकादशी बुधवारी(२० मार्च) साजरी केली जाणार आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आई लक्ष्मीसोबत आवळ्याच्या झाडावर निवास करतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घातल्याने भगवान नारायण आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.