Ramadan Eid 2025 : भारतातील तसंच जगभरातील मुस्लीम नागरिक ईद-उल-फित्रच्या तयारीत आहेत. मुस्लीम धर्मीयांमध्ये ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईद मुस्लीम धर्मींयांचा सर्वात मोठा सण म्हणूनही ओळखला जातो.
मुस्लीम धर्मीयांमध्ये ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईद मुस्लीम धर्मींयांचा सर्वात मोठा सण म्हणूनही ओळखला जातो.
रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा (उपवास) करण्याचा महिना.
ईद-उल-फित्र याचं शब्दशः भाषांतर करायचं झाल्यास उपवास सोडताना साजरा केला जाणारा सण असं करता येऊ शकेल.
रमजान हे एक अरेबिक नाव आहे. इस्लामिक कॅलेंडरमधील नवव्या महिन्याला रमजान महिना म्हणून ओळखलं जातं. मुस्लीम धर्मियांसाठी हा अत्यंत पवित्र महिना आहे.
मुस्लीम धर्मातील पाच मूळ तत्त्वांपैकी एक म्हणूनही रमजान महिना ओळखला जातो. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला ही पाच मूळ तत्त्वं पाळावीच लागतात. अल्लाहने तसा आदेश दिला आहे, असंही म्हटलं जातं.
रमजान महिन्यातच पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली, अशी मुस्लीम धर्मीयांमध्ये मान्यता आहे. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्यावर अधिक भर दिला जातो.
शिवाय, रोजा करणं हा प्रार्थना करण्याचा, अल्लाहच्या जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लीम बांधव मानतात. आरोग्य आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठीही रोजा करणं चांगलं असल्याचं म्हटलं आहे.
ईद साजरी कशी करतात?
जगभरातील अनेक मुस्लीम धर्मीय ३० किंवा ३१ मार्च ( चंद्रदर्शनावर अवलंबून) ईद साजरी करणार आहेत. तरीही मुस्लीम लोकांना ईदच्या आदल्या रात्रीपर्यंत वाट पहावी लागणार कारण चांद्र दिनदर्शिका कधी २९ किंवा ३० दिवसाची असते. चंद्राची पहिली कोर जगाच्या कुठल्या भागात दिसते यावर हे अवलंबून आहे. ईदच्या दिवशी मुस्लीम नवे कपडे घालून मशिदीत जातात. शिरखुर्मासारखे गोड पदार्थ घरात बनवले जातात. ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला जकात असं संबोधलं जातं. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती ही जकात देऊन नमाज पठण करण्यास जाते. नमाजानंतर परतताच मित्र-नातेवाईकांसोबत जेवणावर यथेच्छ ताव मारला जातो. एकमेकांना भेटवस्तू, पैसे दिले जातात. याला ईदी असं म्हटलं जातं. जगभरातील अनेक देशांमध्ये ईदला सार्वजनिक सुटी असते. एखाद्या व्यक्तीला ईदच्या शुभेच्छा द्यायच्या असल्यास त्यांना ईद-मुबारक म्हणून शुभेच्छा दिल्या जातात.
या महिन्यात मुस्लिम धर्माला मानणारे लोक रोज ठेवत असतात आणि अल्लाहची प्रार्थना करत असतात. हा महिना पवित्र असण्याचे एक मुख्य कारण हे देखील आहे की, कुराणानुसार अल्लाहने मुहम्मद पैगंबर यांना आपला दूत म्हणून निवडले होते.
इस्लाम धर्मात रमजानमध्ये उपवास ठेवण्याची प्रथा फार जुनी आहे, इस्लाम धर्मीयांच्या मान्यतेनुसार, जेव्हा मोहम्मद पैगंबर यांना इ.स. ६१० मध्ये इस्लामच्या पवित्र पुस्तक, कुराण शरीफबद्दल माहिती मिळाली तेव्हापासून रमजान हा पवित्र महिना म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. या महिन्यात जगभरातील सर्व मुस्लिम समुदायातील लोक रोजा ठेवत असतात. रोजा ठेवल्याने मनुष्याचे सर्व पाप धुवून जातात असे मानले जाते.
रमजानच्या महिन्याला शब-ए-कद्र असे देखील म्हणतात. असे मानले जाते की याच अल्लाहने आपल्या अनुयायांना कुराण खरीफने नावाजले होते. या रमजानची सुरुवात ही चंद्र पाहून केली जाते तर याचा शेवटचा दिवस हा रमजान ईद किंवा ईद उल फितर या नावाने साजरा केला जातो.
इस्लाममध्ये चंद्राला खूप महत्त्व असते. रमजानची सुरुवात चंद्राला पाहूनच होत असते. सामान्य कॅलेंडर हे सूर्यावर आधारित असते मात्र रमजानची दिनदर्शिका चंद्राला पाहून ठरवली जाते. रमजान चा महिना इंग्रजी महिन्याच्या ११ ते १२ दिवसांआधी सुरू झालेला असतो. कारण चंद्र वर्ष हे सूर्य वर्षापेक्षा लहान असते.
रमजानचा महिना मुस्लिम धर्मातील पाचवा महत्वपूर्ण स्तंभ मानला जातो. रमजानच्या महिन्यात वेगवेगळ्या देशात नियम बदलेले जात असतात. इजिप्त देशात रमजान महिन्यात घड्याळे एक तास पुढे केली जातात कारण सायंकाळच्या वेळी रोजा लवकर सोडता यावा. त्याचबरोबर काही ठिकाणी ऑफिसमध्ये काम करण्याच्या वेळांमध्ये देखील कपात केली जाते कारण लोकांना अल्लाहची प्रार्थना करण्यासाठी जास्त वेळ भेटू शकेल. अनेक मुस्लिम देश जिथे दिवस मोठा असतो आणि चंद्र देखील उशिरा दिसत असतो त्या देशातील लोक मक्काच्या वेळेनुसार रोजा ठेवत असतात. या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून खरेदी जास्त होत असते यामुळे विविध वस्तूंच्या किंमती वाढत असतात.
सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर रोजा सोडणे याला इफ्तार असे म्हणतात तर सकाळी सुर्य उगवण्याच्या आधी काही खाऊन रोज्याची सुरुवात करण्याला सहरी म्हटले जाते.
रोजच्या दिवसांत रात्री ९ वाजता विशेष नमाज पठण केले जाते. रमजान च्या दरम्यान अल्लाहचे नाव घेणे, कुराण पठण करणे आणि दान करणे आवश्यक असते. रमजानच्या या काळात जन्नतची इच्छा करणाऱ्यांना जन्नत मिळते असे मानले जाते. या महिन्यात गरीब लोकांमध्ये जकात आणि फितरी दिली जाते जे एक प्रकारचे दान असते.
अशाप्रकारे रमजानचा पवित्र महिना मुस्लिमांमध्ये प्रेमाची आणि पावित्रतेची भावना निर्माण करत असतो.
संबंधित बातम्या