Eid Ul Fitr 2024 Date : १० की ११ एप्रिल? भारतात ईद कधी साजरी होणार? तारीख कशी ठरते? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Eid Ul Fitr 2024 Date : १० की ११ एप्रिल? भारतात ईद कधी साजरी होणार? तारीख कशी ठरते? जाणून घ्या

Eid Ul Fitr 2024 Date : १० की ११ एप्रिल? भारतात ईद कधी साजरी होणार? तारीख कशी ठरते? जाणून घ्या

Apr 06, 2024 06:49 PM IST

Eid Ul Fitr 2024 Date : इस्लामिक कॅलेंडरच्या १०व्या शव्वालच्या पहिल्या तारखेला आणि रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जातो. ईदची नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही.

Eid Ul Fitr 2024 Date १० की ११ एप्रिल? भारतात ईद कधी साजरी होणार? तारीख कशी ठरते? जाणून घ्या
Eid Ul Fitr 2024 Date १० की ११ एप्रिल? भारतात ईद कधी साजरी होणार? तारीख कशी ठरते? जाणून घ्या (AP)

मुस्लिम समाजासाठी ईद-उल-फित्र हा सण खूप खास आहे. हा सण देशात तसेच परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ईद-उल-फित्रला मीठी ईद असेही म्हणतात. 

मुस्लीम समाजातील लोक रमजान महिन्यात रोजा ठेवतात आणि अल्लाहची उपासना करतात. ईद-उल-फित्रची तारीख चंद्र पाहूनच ठरवली जाते. यावर्षी १२ मार्च २०२४ पासून रमजान महिना सुरू झाला. अशा परिस्थितीत यावेळी ईद कोणत्या दिवशी साजरी होणार हे जाणून घेऊया.

ईद-उल-फितर २०२४ कधी आहे?

इस्लामिक कॅलेंडरच्या १०व्या शव्वालच्या पहिल्या तारखेला आणि रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जातो. ईदची नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही. २९ वा रोजा पूर्ण झाल्यावर चंद्र दिसला तर १० एप्रिलला ईद साजरी होईल, असा अंदाज आहे. तसेच, ३० वा रोजा पूर्ण झाल्यावर चंद्र दिसला तर ११ एप्रिलला ईद साजरी होईल. ईदची तारीख चंद्रदर्शनावर अवलंबून असते.

ईद-उल-फित्रचे महत्त्व

मुस्लिम समाजातील लोक संपूर्ण महिना उपवास करतात. सलग ३० दिवस उपवास करण्याची शक्ती दिल्याबद्दल ईदच्या दिवशी सर्वजण अल्लाहचे आभार मानतात. ईदच्या दिवशी लोक सकाळी नमाज अदा करतात आणि त्यानंतर ईदचा सण सुरू होतो. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देतात. तसेच, भेटवस्तूंची देवाणघेवाणही होते. या दिवशी गोड शेवया तयार केल्या जातात. याशिवाय लोक त्यांच्या श्रद्धेनुसार कमाईचा काही भाग दानही करतात, त्यामुळे या सणाचे महत्त्व वाढते.

Whats_app_banner