मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे. रमजान ईद झाल्यावर सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे, ज्याचा कुराणमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
पवित्र मक्का शहराची वार्षिक तीर्थयात्रा हज संपल्यानंतर धुल हिज्जा या इस्लामी महिन्याच्या १० व्या दिवशी हा सण साजरा केला जातो. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सौदी अरबच्या मक्कामध्ये एकत्र येऊन हज साजरा करतात. ज्यात जगभरातील मुस्लीम सहभागी असतात. याच सणाला ईद-उल-अजहा म्हणतात ज्याचा अर्थ त्यागाची ईद असा आहे. मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईद प्रमाणेच ईद-उल-अजहा विशेष महत्त्व समजले जाते.
या दिवशी सर्व मुस्लीम बांधव एकत्र येऊन ईदची नमाज अदा करतात. सोबतच या दिवशी इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम समाजात बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. ज्याला बकरी ईद म्हणतात. सौदी अरबमध्ये उंट आणि मेंढा यांची कुर्बानी देण्यात येते.
हजरत इब्राहिम यांच्यामुळं अल्लाहला कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली. अल्लाहनं इब्राहिम यांना सर्वात प्रिय वस्तू कुर्बान करण्यास सांगितली. तेव्ही ते एकुलता एक मुलगा कुर्बान करण्यास तयार झाले होते. कुर्बानी देतेवळी त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली होती. कुर्बानी दिल्यानंतर त्यांनी पट्टी काढली तेव्हा मुलाच्या जागी दुंबा असल्याचं त्यांना जाणवलं. अल्लाहनं त्यांच्या मुलाच्या जागी दुंबाला पाठवले अशी मान्यता आहे. तेव्हापासून कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली.
बकरी ईद हा त्यागाचा सण असून, पैगंबर इब्राहिम यांनी अल्लाहच्या आदेशानुसार आपला मुलगा बळी देण्याची तयारी दर्शविली होती. यावर खुश होऊन अल्लाह त्यांना मुलाऐवजी बकरीचे बलिदान करण्याची मुभा दिली होती. तेव्हापासून या सणाला ‘बकरी ईद’ म्हणून ओळखले जाते.
मुस्लिम बांधवांमध्ये ईद-उल-अज्हाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नातेवाईक एकत्र येऊन एकमेकांना भेटवस्तू, मिठाई देतात. या दिवशी आपल्याला प्रिय असलेल्या कोणत्याही गोष्टीची अल्लाहसाठी कुर्बानी द्यावी लागते. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. यासाठी आधी बकऱ्याचे पालनपोषण करून त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यानंतरच तो कुर्बानीसाठी अल्लाहच्या नावे कापण्याची प्रथा आहे.
यावर्षी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई), कतार, कुवेत, ओमान, जॉर्डन, सीरिया, इराक आणि इतर अरब राष्ट्रांसह ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडामधील मुस्लिम ६ जून २०२४ रोजी ईद-उल-अजहा अर्धचंद्र दिसतो का ते पाहणार आहेत. या देशांमध्ये बकरी ईद उत्सव १६ जून २०२४ रोजी होईल, तर हजचा प्रमुख विधी अराफात चा दिवस मंगळवार १५ जून रोजी साजरा केला जाईल.
बुधवार ६ जून २०२४ रोजी मगरिबच्या नमाजानंतर या देशांमध्ये अर्धचंद्र दिसला नाही तर धुल हिज्जा या पवित्र महिन्याचा पहिला दिवस शुक्रवार ७ जून 2024 रोजी साजरा केला जाईल आणि ईद अल अजहा २०२४ उत्सव १७ जून रोजी असेल.
दुसरीकडे भारत, पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, जपान, हाँगकाँग, ब्रुनेईची सल्तनत आणि इतर दक्षिण आशियाई देशांमधील मुस्लिम चंद्र दिसल्यावर ईद-उल-अजहा १७ जून किंवा १८ जून रोजी साजरी करतील.