Mohammed Paigmabar birth: इस्लाम धर्मात, 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' हा सण रबिउल अव्वलच्या महिन्यात मिलादुन्नबीच्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अतिशय खास असतो. कारण या दिवशी इस्लाम धर्माचे सर्वात लोकप्रिय संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला होता. असे मानले जाते की प्रेषित मोहम्मद यांचा जन्म मक्का येथे झाला होता. असे म्हणतात की, अल्लाहने हजरत मोहम्मद यांना अवतार म्हणून पाठवले होते. प्रेषित मोहम्मद यांचे वडील अब्दुल्ला बिन अब्दुल मुत्तलिब होते, तर त्यांची आई आमेनाबी होत्या. हा दिवस मुस्लिम बांधव विविध गोष्टीद्वारे साजरा करतात. शिवाय एकमेकांना सुंदर अशा शुभेच्छाही देतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही सुंदर शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.
''अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद,सुख, समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा,''
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक!
''ईद म्हणजे उत्सव, सण आणि प्रार्थना यांचा काळ!
आपण सर्व चांगले करू,
आणि त्या बदल्यात चांगले मिळवू या.''
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा!
''ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या या शुभ प्रसंगी,
अल्लाह तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
आनंदी आणि आशीर्वादित आयुष्य देवो
अशी माझी इच्छा आहे.''
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक तुम्हा सर्वांस!!
''ईद ए मिलाद घेऊन येई आनंद
जोडू मनाशी मनाचे नवे बंध
सणाचा हा दिवस खास''
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक तुम्हा सर्वांस!!
ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा''
ईद ए मिलाद मुबारक!
''धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊ ईद ची''
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक!
''या आनंदाच्या दिवशी तुम्हाला माझ्या शुभेच्छा पाठवत आहे
आणि आशा करतो की तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत
या ईद उल मिलाद उन नबीचा
सुंदर आणि अर्थपूर्ण उत्सव साजरा कराल.''
ईद-ए-मिलाद मुबारक!
''अल्लाह तुमचे जीवन आनंदाने भरेल
आणि तुमच्या घराच्या दारात आनंद आणेल.
मी प्रार्थना करतो की अल्लाह तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो.''
ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा, माझ्या मित्रा!
''सर्व मुस्लिम बांधवांना
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा…''
ईद ए मिलाद मुबारक!
''ईद निमित्त तुम्हाला सर्वांना
आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा''
ईद ए मिलाद मुबारक!