Amla Tree: या झाडाखाली अन्न शिजवून खाल्ल्याने होतो लाभ; घरातील सर्व त्रास दूर होतात!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Amla Tree: या झाडाखाली अन्न शिजवून खाल्ल्याने होतो लाभ; घरातील सर्व त्रास दूर होतात!

Amla Tree: या झाडाखाली अन्न शिजवून खाल्ल्याने होतो लाभ; घरातील सर्व त्रास दूर होतात!

Nov 07, 2024 05:16 PM IST

Amla Tree: हिंदू धर्मात पिंपळाचे झाड आणि तुळस अशा असे अनेक वृक्षांची पूजा पवित्र मानली जाते. या वृक्षांची पूजा केल्याने देवतांचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे. असाच एक वृक्ष आहे ज्याच्याखाली जर अन्न तयार केले तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

या झाडाखाली अन्न शिजवून खाल्ल्याने होतो लाभ; घरातील सर्व त्रास दूर होतात!
या झाडाखाली अन्न शिजवून खाल्ल्याने होतो लाभ; घरातील सर्व त्रास दूर होतात!

Amla Tree: हिंदू धर्मात वृक्षांना विशेष महत्त्व आहे. धार्मिक दृष्टीने वृक्षांना पवित्र मानले जाते. काही विशेष झाडे अशी आहेत ज्यात दैवी शक्ती वास करतात असे मानले जाते. त्यामुळेच उपवास आणि सणांमध्ये देवतांच्या पूजेबरोबरच झाडांचीही पूजा केली जाते.

पुराणात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अक्षय नवमीला आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. या झाडाखाली अन्न शिजवून खाल्ल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. या मुळे आपले घरगुती त्रास दूर होतात. आवळा नवमीला आवळा वृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व आणि या दिवशी काय करावे हे पाहणे महत्त्वाचे आहे. याबाबत जाणून घेऊ या...

कधी आहे अक्षय नवमी?

आवळा नवमी १० नोव्हेंबर २०२४ रोजी आहे. हा दिवस कार्तिक शुद्ध नवमीचा आहे. विष्णु पुराणानुसार जो कोणी या दिवशी धूप, दिवा आणि नैवेद्य देऊन आवळ्याच्या झाडाची पूजा करतो, त्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते.

आवळ्याचे वृक्ष पूजनीय का आहे?

आवळा वृक्षात भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं. याबाबतच्या पौराणिक कथेनुसार, अक्षय नवमीला सर्वप्रथम माता लक्ष्मीने भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची आवळ्याच्या झाडाखाली पूजा केली. तेव्हापासून हे व्रत लोकप्रिय झाले. या दिवशी केलेले पुण्य कधीच संपत नाही असे पुराणात सांगितले गेले आहे.

आवळ्याच्या झाडाखाली भोजन करण्याचे फायदे

आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली विविध प्रकारचे अन्न तयार करून ते भगवान विष्णूला अर्पण करा आणि नंतर अन्न सेवन करा. असे मानले जाते की यामुळे आपल्या शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते. आपल्या शरीरातील आजारही बरे होतात.

धार्मिक श्रद्धेनुसार जर एखाद्या व्यक्तीने आवळ्याच्या झाडाच्या सावलीत अन्न तयार करून ब्राह्मणाला दिले आणि स्वतःही ते भोजन केले तर त्याला दुःखापासून मुक्ती मिळते. मानसिक तणाव दूर होतो. यासोबतच व्यक्तीला अखंड सौभाग्य, आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो.

आवळ्याच्या फळाचे सेवन केल्याने मनुष्य नारायणासारखा म्हणजेच पूर्ण दैवी गुणांचा होतो. आवळ्याच्या फळाचे सेवन केल्यानंतर त्या व्यक्तीला त्यांना देवाचा आशीर्वाद तर मिळतोच पण हे सर्वात आरोग्यदायी आणि आयुष्य वाढवणारे फळ देखील आहे, असे पुराणकथांमध्ये म्हटले आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner